Warning: sprintf(): Too few arguments in /var/www/wp-content/themes/covernews/lib/breadcrumb-trail/inc/breadcrumbs.php on line 254

कॉंग्रेसच्या प्रचाराला जल्लोषात प्रारंभ

Support Our Journalism Contribute Now

पुणे-‘येणार येणार पंजा येणार’, ‘गली गली में शोर है,चौकीदार चोर है’… अशा घोषणांचा निनाद, फटाक्यांची आतषबाजी आणि बँडच्या संगीताच्या वातावरणात, पुणे शहराचे ग्रामदैवत कसबा गणपतीचे दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ वाढवून पुणे लोकसभा मतदार संघाच्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप, रिपब्लिकन पीपल्स आघाडी व मित्र पक्षांच्या आघाडीच्या प्रचाराचा प्रारंभ झाला. यावेळी आघाडीकडून इच्छुक असलेले अरविंद शिंदे, माजी आमदार मोहन जोशी, प्रवीण गायकवाड,अॅड. अभय छाजेड यांच्यासह कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, खासदार वंदना चव्हाण, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे हे कार्यकर्त्यांसह सहभागी झाले होते. आघाडीकडून लवकरच उमेदवार घोषित केला जाईल आणि आमचा उमेदवार प्रचंड मतांनी निवडून येईल. तसेच पक्ष ज्या उमेदवाराला संधी देईल. त्याचे आम्ही काम सर्वजण एकदिलाने करणार असा निश्चय यावेळी सर्वांनी व्यक्त केला.
पुणे लोकसभा मतदार संघाच्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप, रिपब्लिकन पीपल्स आघाडी व मित्र पक्षांच्या आघाडीच्या प्रचाराचा प्रारंभ पुणे शहराचे ग्रामदैवत कसबा गणपतीचे दर्शन घेऊन व नारळ वाढवून करण्यात आला. यावेळी आघाडीतील सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या पक्षाचे झेंडे हातात घेवून गर्दी केली होती. कार्यकर्त्यांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. प्रचाराचा नारळ फोडून कार्यकर्त्यांची पदयात्रा त्वष्टा कासार मंदिर, पवळे चौक, साततोटी चौक, फडके हौद, आरसीएम गुजराथी हायस्कूल या मार्गाने जाऊन नगरसेवक रविंद्र धंगेकर यांच्या कार्यालयाजवळ या पदयात्रेचा समारोप झाला. पदयात्रेच्या माध्यमातून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. या पदयात्रेत बाळासाहेब शिवरकर,अंकुश काकडे, डॉ. सतीश देसाई, शांताराम कुंजीर, प्राचीताई दुधाने, रवींद्र माळवतकर, प्रदीप देशमुख, रवींद्र धंगेकर,कमलताई ढोले पाटील, दीप्ती चवधरी,कमलताई व्यवहारे, दत्ता गायकवाड, दत्ता बहिरट, सदानंद शेट्टी, सुजाता शेट्टी, अविनाश बागवे, वीरेंद्र किराड, अजित दरेकर, मनीष आनंद, रशीद शेख, गीता राजपूत, रवींद्र माळवतकर, लता राजगुरू, सोनाली मारणे, वैशाली मराठे, रमेश भांड, फैय्याज शेख, अमित बागुल, रफिक शेख, समद शेख, राजू शेख, एडविन रॉबर्ट, मनोहर नांदे, सचिन आडेकर, राजाभाऊ महाजन, शेखर कपोते, विजय खळदकर,मनोहर नांदे, राजेंद्र पडवळ, संदीप मोरे, कैलास कदम, अशोक पवार, शिवाजी केदारी, गणेश भंडारी, राजू साठे, नारायण गोंजारी, प्रदीप परदेशी, सुनील घाडगे, रमेश सगट, शोयब इनामदार, निलेश बोराटे, सुधीर कुरुमकर, हुसेन रानबरे, विशाल मलके, निनाद अहुवालिया, राजेंद्र भुतडा, सुनील दैठणकर, बाळासाहेब सोनावणे, देवेंद्र नायडू, राजू अरोरा, अशोक लांडगे यांसह सर्व पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय होती.
उमेद्वार कोणीही असेल परंतु मतदान फक्त “पंजा” आणि काँग्रेसला पाहून करा असे आवाहन रमेश बागवे यांनी यावेळी केले.

Punekar News is now on Telegram. For the latest Pune, Pimpri Chinchwad PCMC news, Like our Facebook Page, follow on Twitter and Instagram and also subscribe to Punekar News on Telegram.