Warning: sprintf(): Too few arguments in /var/www/wp-content/themes/covernews/lib/breadcrumb-trail/inc/breadcrumbs.php on line 254

खेळाडू ,दिव्यांगांचे प्रशिक्षक ,सामाजिक कार्यकर्त्यांचा होणार गौरव

पुणे :
‘म्हाळूपार्वती प्रतिष्ठान’ च्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त  आंतरराष्ट्रीय स्पर्धात सहभागी झालेले पुण्यातील दिव्यांग खेळाडू ,दिव्यांग खेळाडूंचे  प्रशिक्षक ,सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात येणार आहे .
‘युक्रांद ‘चे संस्थापक ,माजी आमदार डॉ .कुमार सप्तर्षी यांच्या उपस्थितीत ४ एप्रिल रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . हा कार्यक्रम पंडित भीमसेन जोशी कलादालन ,औंध ,पुणे येथे ४ एप्रिल ४ वाजता होणार आहे .
प्रतिष्ठान चे अध्यक्ष निलेश प्रकाश निकम यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली . कार्य्रक्रमाच्या नियोजनासाठी प्रतिष्ठानची नुकतीच  बैठक झाली . या बैठकीला निलेश निकम ,प्रकाश निकम ,पूनम हेंद्रे ,डॉ . संजय जोशी ,विलास निकम ,बबन निकम ,शैलेश हेंद्रे ,विशाल सुर्वे ,बाळासाहेब हेंद्रे ,अतुल जोशी ,श्रद्धा जोशी उपस्थित होते .
कार्यक्रमाला डॉ कुमार सप्तर्षी ,माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार ,अभिनेते प्रसाद सुर्वे ,मिलिंद शंभरकर (समाज कल्याण विभागाचे आयुक्त ),नितीन ढगे (अपंग कल्याण विभागाचे उपायुक्त ),दत्ता साने (विरोधी पक्षनेते ,पिंपरी -चिंचवड मनपा ),राजेंद्र गोळे (जिल्हा अधीक्षक ,भूमी अभिलेख विभाग ) हे पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत .
 याच कार्यक्रमात पुणे जिल्ह्यातील दिव्यांग क्षेत्रात कार्यरत  शाळांना बॅटरी वरील ध्वनिक्षेपण यंत्रणा ,खेळाडूंना मोबाईल संच ,ट्रॅक सूट ,बॅग ,प्रथमोपचार पेटी ,सन्मानचिन्ह असा संच भेट दिला जाणार आहे

Support Our Journalism Contribute Now