गोवा टुरिझमतर्फे दोन भव्य कार्यक्रमांची घोषणा – ग्रेप एस्केपेड आणि गोवा व्हिंटेज कार आणि बाइक महोत्सव २०१८

Share this News:

– 19 ते 22 एप्रिल 2018 दरम्यान डी. बी. बांदोडकर मैदान, कंपाळ, पणजी येथे ग्रेप एस्केपेडचे आयोजन

29 एप्रिल 2018 रोजी आयनॉक्स कोर्टयार्ड येथे गोवा व्हिंटेज कार आणि बाइक महोत्सवाचे आयोजन

पणजी, १३ एप्रिल – विविध सणांची भूमी असलेल्या गोव्याकडे जगाला दाखवण्यासाठी बरेच काही आहे आणि त्यातील एक महत्त्वाचा पैलू म्हणजे इथले सण. एप्रिल २०१८ च्या दुसऱ्या पंधरवड्यात दुहेरी मजा अनुभवता येणार आहे.

ग्रेप एस्केपेड आणि गोवा व्हिंटेज कार आणि बाइक महोत्सव २०१८ या दोन अतिशय आकर्षक कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी गोवा टुरिझम सज्ज झाले आहे.

ग्रेप एस्केपेड २०१८ – भारतातील अतिशय लोकप्रिय असा जीवनशैली आणि वाइन महोत्सव म्हणजेच ग्रेप एस्केपेड २०१८ गोवा टुरिझमतर्फे गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून १९ ते २२ एप्रिल दरम्यान डी. बी. बांदोडकर मैदान, कंपाळ, पणजी येथे संध्याकाळी सहानंतर आयोजित करण्यात आला आहे.

हे ग्रेप एस्केपेडचे १४ वे वर्ष आहे. उन्हाळी सुट्ट्यांचा मौसम लक्षात घेता या चार दिवसीय कार्यक्रमात लाखो पर्यटक सहभागी होतील असा अंदाज असून राज्यातील पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होईल.

गेल्या इतकी वर्ष ग्रेप एस्केपेडने कायमच स्थानिक उद्योजकांना आपले ज्ञान, उत्पादने प्रदर्शित करण्यासाठी, बीटुबी संपर्क साधण्यासाठी आणि गोवन तसेच पर्यचकांना विनयार्डमधील स्वाद, गोवन खाद्यपदार्थ चाखण्याची संधी देण्यासाठी, गोव्याची संस्कृती व परंपरा अनुभवण्यासाठी व्यासपीठ पुरवले आहे.

या कार्यक्रमात सर्वोत्तम वाइन, खाद्यपदार्थ, फॅशन आणि मनोरंजन यांचा मिलाफ पाहायला मिळतो. या चार दिवसीय महोत्सवात पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील व्यावसायिक, हॉटेलमालक, रेस्टॉरंट मालक, उत्पादक आपापल्या दर्जेदार उत्पादनांसह सहभागी होत असतात.

गोवा व्हिंटेज कार आणि बाइक महोत्सव २०१८ – गोवा टुरिझमचा व्हिंटेज बाइक आणि कार महोत्सव 29 एप्रिल 2018 रोजी पणजीतील आयनॉक्स कोर्टयार्ड येथे सकाळी दहा वाजता सुरू होईल.

गोवा टुरिझमचा व्हिंटेज बाइक आणि कार महोत्सव विविध व्हिंटेज बाइक आणि कार चालक, वापरकर्ते, संग्राहक व चाहत्यांना एकत्र आणणारा असून ते आपल्या अभिमानास्पद गाडीसह राजधानीचे शहर असलेल्या पणजीमध्ये परेड काढतील.

व्हिंटेज बाइक आणि कार रॅली आयनॉक्स कोर्टयार्ड ते मिरामार वर्तुळ अशा मार्गावरून दिवजा वर्तुळावरून परत आयनॉक्स कोर्टयार्डकडे जाईल जिथे या गाड्या संध्याकाळी सहानंतर लोकांना पाहाण्यासाठी ठेवल्या जातील. यानंतर व्हिंटेज गाड्यांना वेगवेगळ्या विभागानुसार बक्षिस आणि प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम पार पडेल. या विभागांमध्ये सर्वात जुने वाहन, सर्वात आकर्षक वाहन, सर्वात दुर्मीळ वाहन यांचा समावेश आहे.

प्रेक्षकांसाठी संध्याकाळी फॅशन शो आणि मनोरंजनाच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्याद्वारे हा कार्यक्रम संस्मरणीय केला जाणार आहे.

Follow Punekar News: