Warning: sprintf(): Too few arguments in /var/www/wp-content/themes/covernews/lib/breadcrumb-trail/inc/breadcrumbs.php on line 254

घर खरेदी करण्यास हाच उत्तम काळ : भीमसेन अग्रवाल

Support Our Journalism Contribute Now

9 May 2019, पुणे : भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये पुन्हा पाव टक्क्यांची कपात जाहीर करून 6 टक्क्यांवर आणला आहे. तसेच घरांचे बाजारपेठेतील विक्रीमूल्य ठरवणार्‍या रेडी रेकरनरच्या दरांमध्येही यंदा कोणतीही वाढ होणार नसून, 2018-19 या वर्षासाठी 2017-18चेच दर कायम राहणार आहेत. यंदा रेडीरेकनरच्या दरात वाढ न करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून तो निश्‍चितच स्वागतार्ह आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून जागेच्या कागदोपत्री मूल्यात वाढत झाली नसल्याचा सकारात्मक संकेत या निर्णयातून होतो. ग्राहकांनी हे लक्षात घेऊनच  आता घरांच्या वाढत्या किमतीबद्दल चिंता करू नये. घरांचा दर आज मितीला असणारा नीच्चांकी दर असून इथून पुढे याहून हा दर अजून कमी होण्याची शक्यता नाही. त्यामुळे ग्राहकांनी या संधीचा लाभ घेवून घर खेरेदी हाच उत्तम काळ असल्याचे पिंपरी चिंचवडचे विश्‍वसनीय म्हणून आळखले जसणारे ऐश्‍वर्यम् गु्रपचे चेयअरमेन भीमसेन अग्रवाल यांनी म्हटले आहे.  ऐवढेच नव्हे तर आमच्या संस्थेच्या वतीने सुमारे 215 ग्राहकांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ व जीएसटी आणि अन्य छुप्या खर्चात सुट मिळवून देत, जो फ्लॅट 25 लाखाचा आहे, तो फक्त सुमारे 19,73000 रूपयात  ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आला आहे.  त्यामुळे हीच योग्य वेळ आहे फ्लॅट खरेदी करण्याचा, असे अग्रवाल यांनी सांगितले.
कर्ज स्वस्त झाले आहे, रेडी रेकरनर दर स्थिर पाहता तसेच सरकार करून कमी केलेली जीएसटी चा लाभ हा नक्कीच ग्राहकांना मिळणार आहे. ग्राहकांनी आणखीन दर कमी होण्याची वाट न पाहता सर्वांगाने मिळालेल्या संधी चे सोने करावे आणि आपले स्वप्नातील घर त्वरीत घ्यावे, असेही अग्रवाल म्हणाले. हा आता आलेला सुवर्ण काळ कितपत असाच राहिल हे सांगता येत नाही, त्यामुळे संधी दवडू नये. याच बरोबर आम्ही आणखी दर कमी करण्याच्या उद्देशाने सरकार काही मागण्या ठेवणार आहोत. त्यामध्ये प्रकल्प मूल्यांकन निर्णय पद्धत चालू करणे, पार्किंगच्या मूल्यमापनमधील विसंगती दूर करणे, रेडी रेकनर निश्‍चित करण्यासाठी सूक्ष्म नियोजन प्रक्रिया अवलंबिणे, 3 ते 5 वर्षांत एकदा रेडीरेकनरचे प्रकाशन, तळ टीपांमध्ये दुरुस्त्या, मूल्यांकन मूल्य कराराचे  निराकरण यागोष्टी प्राधान्याने सरकारने करणे आवश्यक आहे त्याचवेळी गेल्या 5 वर्षात स्टॅम्प ड्युटी 40 टक्क्यांनी वाढवण्यात आलीये त्याचा पुनर्विचार केला पाहिजे. तसेच सिमेंट आणि स्टीलचे वाढते दर कोठेतरी रोखण्यास नियोजन करणे किवां कमी करण्यास प्रयत्न केले गेले पाहिजे. या मागण्याचा समावेश आहे. जेणे करून परवडणार्‍या घरे ग्राहाकंना उबलब्ध होतील. असे ही यावेळी अग्रवाल यांनी स्पष्ट केले.  बांधकाम क्षेत्राला उभारी देण्यासाठी याचा पुनर्विचार करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.  वित्तसंस्थामार्फतही मोठ्या प्रमाणात कर्जांची उपलब्धता होत असल्याने याचा लाभ इच्छुक ग्राहक घेतील, अशी आशा अग्रवाल यांनी व्यक्त केली.
ऐश्‍वर्यम् गु्रप एफएमसीजी मॅन्युफक्चरिंग आणि कन्सट्रक्शन क्षेत्रात कार्यरत आहे. आता पर्यंत कन्स्ट्रक्शन मध्ये 6 निवासी प्रोजेक्ट आणि कमर्शियल प्रोजेक्ट ऐस्सन ग्रुप ने बनविले आहे.  ऐश्‍वर्यम्, ऐश्‍वर्यम् कोर्टयार्ड, ऐश्‍वर्यम् कंफर्ट,  ऐश्‍वर्यम् निवारा, ऐश्‍वर्यम् हमारा आणि कमर्शियल मॉल ऐश्‍वर्यम् वून आणि  ऐश्‍वर्यम् कंफर्ट गोल्डचा समावेश आहे. आता पर्यंत एकूण 25 लाख चौ.फुटाचे बांधकाम केले आहे.  3000 फ्लॅटचे हस्तांतरण केले आहे. एकूण 50 लाख चौ.फुटाचे सध्या बांधकाम चालू आहे.  सर्व प्रोजेक्टस् रेरा प्रमाणित आहेत. पिंपरी चिंचवड परिसरात  ऐश्‍वर्यम् नावाचेे साम्राज्यात अनेक चांगले प्रोजेक्ट दिले आहेत. असेही ऐश्‍वर्यम गु्रपचे चेयअरमेन भीमसेन अग्रवाल म्हणाले.
Punekar News is now on Telegram. For the latest Pune, Pimpri Chinchwad PCMC news, Like our Facebook Page, follow on Twitter and Instagram and also subscribe to Punekar News on Telegram.