Warning: sprintf(): Too few arguments in /var/www/wp-content/themes/covernews/lib/breadcrumb-trail/inc/breadcrumbs.php on line 254

चर्चा अभिनेता अमेय वाघच्या नव्या लूकची

17 May 2019 : गर्लफ़्रेंड चा टीजर बाघितला का? त्या फिल्मसाठी मी आठ किलो वजन वाढवलं होतं ! आता back to normal ! फरक कसा वाटतोय ब्रोच्यांनो? ही अभिनेता अमेय वाघ याची सोशल मिडीया मधील पोस्ट सध्या चर्चेत आहे. अमेय वाघ मराठी फिल्म्स इंडस्ट्रीचा युवा चेहरा म्हणून ओळखला जातो प्रायोगिक नाटकाची पार्श्वभूमी असलेल्या अमेयने आजवर अनेक नाटकांमध्ये, मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये काम केले. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतील कैवल्यच्या भूमिकेने तो घराघरात पोहोचला. ‘मुरांबा’ आणि ‘फास्टर फेणे’ मधील त्याच्या भूमिका प्रेक्षकांचा चांगल्याच पसंतीस उतरल्या.आगामी ‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटातून अमेय पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून, या चित्रपटासाठी अमेयने खास तयारी केलेली दिसते. कलाकार, नेहमीच आपल्या भूमिकेशी समरस होण्यासठी तयारी करताना दिसतात, त्यावत वजन घटवणे, शरीरयष्टी बनवणे हा प्रकार मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. मात्र, आगामी ‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटासाठी अमेयने आपले वजन वाढवल्याचे दिसते. अमेय ‘गर्लफ्रेंड’ चित्रपटाच्या टीझर आणि पोस्टर मध्ये बराच सुदृढ झालेला दिसतो, शिवाय त्याची वाढलेली दाढी आणि विशेष आकाराचा चष्मा हा त्याचा लुक सध्या सर्वांच्याच चर्चेचा विषय बनला आहे. ‘गर्लफ्रेंड’चे लेखन आणि दिग्दर्शन उपेंद्र सिधये यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती अनिश जोग आणि रणजीत गुगळे यांनी केली आहे. त्यांनी यापूर्वी ‘टाईम प्लीज’, डबल सीट’, ‘yz’, ‘मुरांबा’ आदी चित्रपटांची निर्मिती केली आहे. या चित्रपटात अमेयची ‘गर्लफ्रेंड’ नक्की कोण आहे? याचीही चर्चा सध्या सोशल मिडीयावर चांगलीच रंगल्याचे दिसते.