Warning: sprintf(): Too few arguments in /var/www/wp-content/themes/covernews/lib/breadcrumb-trail/inc/breadcrumbs.php on line 254

पवनामाई घाट स्वच्छता अभियान.

आज दिनांक ३१.३.२०१९ रविवार रोजी जलदिंडि प्रतिष्ठान, भावसार व्हिजन इं पिंपरी चिंचवड, चेंज मेकर्स टुडे, रोटरी क्लब वाल्हेकर वाडी, पोलिस नागरीक मित्र तनपुरे फ़ाउंडेशन, संस्कार प्रतिष्ठान, जेष्ठ नागरीक संघ व अंघोळीची गोळी या सामाजिक संघटनेच्या माध्यमातुन व तसेच शैक्षणिक संस्था डॉ. डि. वाय. पाटिल इन्स्टिट्युट आफ़ इंजिनीयरींग मॅनेजमेंट ॲण्ड रिसर्च, आकुर्डी, डॉ. डि. वाय. पाटिल इन्स्टिट्युट आफ़ टेक्नोलॉजी, जे.एस.पि.एम.एस राजश्रि शाहु कॉलेज आफ़ इंजिनीयरींग, ताथवडे ह्यांच्या मार्फ़त पवनामाई घाट स्वच्छता अभियानास सुरुवात झाली. सुमारे ४० ते ५० सामाजिक संघटना सभासद व महाविद्यालायातील ८० ते ९० विद्यार्थी यांनी सक्रीय सहभाग घेतला.
नदी जवळ जाण्यासाठी शहरातील वा गावामध्ये जाण्यासाठी नदी घाट हेच माध्यम असते आणि ते नदीचे अविभाज्य अंग आहेत. पुर्वीच्या भारतीय संस्कृतीत नदी शेकडो घाट नदीच्या किनाऱ्यावर
विखुरलेले आहेत आणि हिंदू धर्मात नदीच्या किनाऱ्यावरअसलेल्या या घाटांवर, एखाद्याने संस्कार स्नान, धार्मिक उत्सव, आशीर्वाद अर्पण पाण्यासाठी उपयोग केला जातो. पण आता नदीचे प्रदुषण
प्र्चंड प्रमाणावर वाढलेले आहे व नदी प्र्दुषणाचे घाट हे महत्वाचे स्तोत्र आहे. या नदीत मोठ्याप्र्माणात प्लस्टिक, कागद, जुन्या देवींचे फ़ोटो, मुर्ती, कपडे, गाद्या, निर्मल्य तेही प्लस्टिक
पिशव्यामध्ये घाटवरुनच टाकण्यात येतात. यावर उपाय म्हणुन मोठ्यप्र्माणावर जनजागृती करण्याची आवश्यक्ता आहे, यासाठी नदीवर लोंकानी यायला पाहिजे. हाच मानस मनात ठेवुन
पवनामाई घाट स्वच्छता अभियानाची सुरुवात करण्यात आली होती. आज दिनांक ३१.३.२०१९ रविवार रोजी या अभियानाची सुरुवात करण्यात आली. नमुद केलेल्या समाजिक संघटना व शैक्षणिक संस्था
या उपक्र्मव्दारे एकत्र आल्या व त्यांच्या सहभागातुन सुमारे ४ ते ४.५ ट्न कचरा गोळा करण्यात आला.
आपल्या मनोगतात डॉ. डि. वाय. पाटिल इन्स्टिट्युट आफ़ इंजिनीयरींग मॅनेजमेंट ॲण्ड रिसर्च, आकुर्डी, डॉ. डि. वाय. पाटिल इन्स्टिट्युट आफ़ टेक्नोलॉजी, चे एल. आर. चौधरी सर व रोहीत शिंदे यांनी आजच्या उपक्रम असेच राबवावे व यात त्यांच्याबरोबर पुढिल येण्याय्रा सर्व उपक्रमात जास्तीत जास्त विदयार्थी सहभाग घेतील अशी हमी दिली. जे.एस.पि.एम.एस राजश्रि शाहु कॉलेज आफ़ इंजिनीयरींग, ताथवडे च्या प्राध्यापिका सौ भारती महाजन यांनी तांत्रिकी मार्गदर्शन बरोबर जास्तीत जास्त सहभागाची हमी दिली. सहभागी विदयार्थींच्या प्रतिक्रीया फारच बोलक्या होत्या. यात प्रामुख्याने प्लस्टीकचा व
पाण्याचा गैरवापर यावर चिंता व्यक्त केली व तसेच निर्माल्य नदीत टाकण्यावर बंदी घालावी व अश्या उपक्रमात एकजुटीने काम करण्यात आनंद मिळालाअश्या भावना व्यक़्त केल्या. या कार्यक्रमास पिंपरी चिंचवड आरोग्य खात्याचे श्री इंदलकर व डॉ शैलजा भावसार व तसेच पाणी पुरवठा विभागाच्या सौ. मनिषाताई हिंगणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमास सुर्यकांत मुथियान अनिल पालकर शिरीष पांडव व भावसार व्हिजनचे अध्यक्ष गणेशजी जवळकर यांचे मार्गदर्शन लाभले. सदर उपक्रम प्रत्येक महिन्यात राबविण्यासाठी प्रत्येकांने मंजुरी दिली.