Warning: sprintf(): Too few arguments in /var/www/wp-content/themes/covernews/lib/breadcrumb-trail/inc/breadcrumbs.php on line 254

‘बाबो’ मधून रमेश चौधरी यांचे दिग्दर्शनात पदार्पण

Support Our Journalism Contribute Now

11 May 2019 : सोशल मिडीयावर एका चित्रपटाच्या पोस्टर्स आणि गाण्यांची चर्चा आहे. या पोस्टर्सवर अनेक कलाकारांचे व्यंगात्मक विनोदी चेहरे तरगाण्यांमध्ये रोमान्स आणि जल्लोष बघायला मिळतो. एका इरसाल गावातील बिलंदर नमुन्यांची ही कथा असल्याचे, चित्रपटाच्या टीझर मधून जाणवते, या चित्रपटाचे नाव ‘बाबो’ असून चित्रपटाची निर्मिती ‘मल्हार फिल्म्स क्रिएशन्स’ यांची आहे तर रमेश चौधरी एक वेगळा विषय घेउन दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत.

रमेश चौधरी मागील दशकभरापासून मराठी चित्रपटसृष्टीत कार्यरत असून विविध चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. शालेय जीवनापासून चित्रपट आणि नाटकाचे वेड असल्याने सातवी – आठवी पासून गणपती मंडळाच्या जिवंत देखाव्यात सहभागी होत अभिनय सुरु केला, पुढे महाविद्यालयीन जीवनात विविध पथनाट्यांमध्ये काम करत त्यांनी आपला प्रवास सुरु ठेवला. ‘बाबो’ मधून दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत असताना या चित्रपटात प्रमुख भूमिकेतही रमेश चौधरी दिसणार आहेत.

‘बाबो’ चित्रपटा विषयी बोलताना रमेश चौधरी म्हणाले की, चित्रपटाचे निर्माते सचिन बाबुराव पवार यांनी माझ्यातील कलाकाराचा संघर्ष अनेक वर्षे जवळून बघितला आहे, त्यांनी माझे काम बघून हा चित्रपट दिग्दर्शित करण्याची संधी दिली. चित्रपट हे मनोरंजनाचे साधन आहे आणि आपण प्रेक्षकांना हसायला लावणारा, त्यांचे चार घटका मनोरंजन करणारा चित्रपट बनवावा असे आमचे ठरले. त्यामुळे तशा धाटणीचा चित्रपट लिहिण्यासाठी आम्ही अरविंद जगताप यांना गाठले. त्यांनी ‘बाबो’ चित्रपटाचे कथा, पटकथा आणि संवादलेखन केले आहे.

‘बाबो’ हा एका गावात घडणारा चित्रपट आहे. या गावावर अचानक एक संकट येतं आणि मग गावकरी नेमकं काय करतात? हे आम्ही अतिशय हटके अंदाजात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटाला रोहित नागभिडे आणि ट्रीनिटी ब्रदर्स यांचे संगीत लाभले असून ‘म्याड रं’ नंतर आता ‘नाचकाम कंपल्सरी’ हे गाणे सर्वत्र गाजत आहे. या चित्रपटात सयाजी शिंदे, किशोर कदम यांच्यासह इतर कलाकरांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. प्रेक्षकांचे धम्माल मनोरंजन करणारा ‘बाबो हा चित्रपट येत्या ३१ मे रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Punekar News is now on Telegram. For the latest Pune, Pimpri Chinchwad PCMC news, Like our Facebook Page, follow on Twitter and Instagram and also subscribe to Punekar News on Telegram.