राष्ट्रिय रेल्‍वे सप्‍ताह निमित्‍त भोपाल येथे आयोजीत  ‘’2018 राष्ट्रिय रेल्‍वे प्रदर्शना’’ त मध्‍य रेल्‍वे ची गॅलेरी आकर्षणाचा मुख्‍य केंद्र

just pune things app
Share this News:

राष्ट्रिय रेल्‍वे सप्‍ताह 2018 च्‍या दरम्‍यान भोपाल हाट येथे भरवण्‍यात आलेल्‍या प्रदर्शनात दिनांक 15.4.2018 रोजी मध्‍य रेल्‍वे गॅलेरीचे श्री अश्‍वि‍नी लोहानी, अध्‍यक्ष, रेल्‍वे बोर्ड यांनी अवलोकन केले. श्रीमती अर्नुनिमा लोहानी,अध्‍यक्ष, रेल्‍वे महिला कल्‍याण संघठन, श्री रजनीश सहाय,सचिव, रेल्‍वे बोर्ड आणि अन्‍य अधिकारीगण याप्रसंगी उपस्थित होते. श्री डी. के. शर्मा, महाव्‍यवस्‍थापक, मध्‍य रेल्वे यांनी मध्‍य रेल्‍वे द्वारा लावण्‍यात आलेल्‍या प्रदर्शना संदर्भात विस्‍तारपूर्वक माहिती दिली. याआधी मध्‍य रेल्‍वे सांस्‍कृतिक अकादमीच्‍या कलाकारांनी बुंदेलखंडचे सांस्कृतिक नृत्‍य अहीर द्वारा पाहुण्‍यांचे स्‍वागत करण्‍यात आले. मध्‍य रेल्‍वे द्वारा लावण्‍यात आलेले प्रदर्शन जेव्‍हा सर्व जनतेसाठी उघडण्‍यात आले तेव्‍हा पहिल्‍याच दिवशी 8000 पेक्षा जास्‍त लोकांनी याचे अवलोकन केले. मध्‍य रेल्‍वेच्‍या सर्व विभाग आणि उत्‍पादक केंद्रातून मध्‍य रेल्‍वेचे यश आणि रेल्‍वेत असलेल्‍या विकासकामांची माहीती डिस्‍प्‍ले बोर्ड, फोटोग्राफ, चित्रफित इत्‍यादी द्वारे मांडण्‍यात आली आहे. श्री सुनील उदासी, मुख्‍य जनसंपर्क अधिकारी, मध्‍य रेल्‍वे यांनी ‘’मध्‍य रेल्‍वेने 1853 ते 2018 पर्यंत रेल्‍वेत झालेले बदल/सुधारणा, नागपुर विभागातील डबल डायमंड क्रॉसिंग, सॅन्‍डहर्स्‍ट रोड उन्‍नत रेल्‍वे स्‍टेशन, प्रसिध्‍द गाड्या, मध्‍य रेल्‍वेतील यशस्‍वी महिला, छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस जागतिक वारसा इमारत, सर्वसामान्‍य जनतेसाठी आकर्षणाचा मुख्‍य केंद्र असलेले छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस भवनचे प्रमाणित मॉडेल’’ इत्‍यादिंची माहीती दिली. हे प्रदर्शन सर्वसामान्‍य जनतेसाठी दिनांक 16.4.2018 ते 17.4.2018 पर्यंत नि:शुल्‍क खुले राहील.