रॉयल एन्फिल्डतर्फे थंडरबर्ड एक्स बाजारात दाखल

just pune things app
Share this News:

रॉयल एन्फिल्डतर्फे एक नवीन, खास पद्धतीने डिझाईन केलेली थंडरबर्ड एक्स बाईक बाजारात आली आहे. खास कल्पनाशक्ती वापरून केलेले आजच्या युगाला साजेसे डिझाईन, काळ्या रंगाचा दिमाख आणि इतर आकर्षक रंगांचा चॉइस अशी प्रलोभने घेऊन आलेली थंडरबर्ड एक्स ही एक जास्त बेधडक बाईक आहे. गेटअवे ऑरेंज, ड्रिफ्टर ब्लू हे थंडरबर्ड ५००एक्ससाठी आणि व्हिमजिकल व्हाईट आणि रोव्हिंग रेड हे थंडरबर्ड ३५०एक्ससाठी या खास रंगात ती उपलब्ध आहे.

२००२ मध्ये आगमन झालेल्या थंडरबर्डने तिच्या कालानुरूप बदलत्या डिझाईन्स आणि स्टाईल्समुळे गेली पंधरा वर्षे युवा पिढ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. हीच प्रेरणा साजरी करण्यासाठी आणि शहरी तरुणांना त्यांच्यातील गुणांना बाहेर काढण्यास वाव देण्यासाठी आलेली थंडरबर्ड एक्स म्हणजे थंडरबर्डला दिलेला एक ठळक नवा ‘टि्वस्ट’ आहे आणि ‘कस्टम कुल’ असण्याची एक नवी संकल्पना आहे.

थंडरबर्ड एक्सची घोषणा करताना श्री. रुद्रतेज (रूडी) सिंग, अध्यक्ष, रॉयल एन्फिल्ड, म्हणाले थंडरबर्डच्या घराण्याचा मानमरातब ‘थंडरबर्ड एक्स’ ही बाईक वाढवणार आहे. आमचे रायडर्स गेली वर्षानुवर्षे रॉयल एन्फिल्ड आणि थंडरबर्डचा नवनवा अनुभव घेत आले आहेत. यातूनच प्रेरणा घेऊन आम्ही एक जास्त स्टायलिश आणि जास्त बेधडक पण तरीही जास्त आकर्षक असे मॉडेल घेऊन आलो आहोत. या मॉडेलमध्ये आणखी नवनवीन बदल घडतील आणि येणाऱ्या पिढ्या यांच्या प्रेमात पडत राहतील, अशी आमची खात्री आहे. थंडरबर्ड आणि थंडरबर्ड एक्स ही दोन्ही रूपे शहरातल्या रस्त्यांना एक नवा दिमाख देतील आणि हायवेवर राज्य करत राहतील. टीबीएक्समुळे तरुणाईला तिचे स्वतंत्र अस्तित्व अधिक निर्भयपणे आणि दिमाखात मिरता येईल.

या नव्या बाईकच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलताना श्री. शाजी कोशी, हेड भारत+बिझिनेस, म्हणाले “मध्यम आकाराच्या बाइक्समध्ये थंडरबर्ड एक नवा उत्साह घेऊन येईल आणि रॉयल एन्फिल्डच्या परिवारात नवनवीन ग्राहकांची भर पडेल. थंडरबर्ड एक्स भारतातल्या सर्व प्रमुख शहरांमधील रॉयल एन्फिल्ड डीलर्सकडे आणि शोरूम्समध्ये उपलब्ध असतील. थंडरबर्ड ५००एक्सची किंमत असेल रु,१,९८,८९८ (एक्स शोरूम दिल्ली) आणि थंडरबर्ड ३५०एक्सची किंमत असेल रु.१,५६,८४९ (एक्स-शोरूम दिल्ली)

थंडरबर्ड एक्स ही बाईक नव्या युगाच्या रायडरच्या स्वभावाचा, गरजांचा आणि आवडीनिवडीचा विचार करून तयार करण्यात आली आहे. दणकट आणि तरीही सुंदर अशी काळ्या रंगातली रचना आणि तिला पूरक अशी आकर्षक रंगसंगती, ठळकपणे उठून दिसणाऱ्या टॅन्क्स इत्यादी वैशिष्ट्यांमुळे थंडरबर्ड एक्स भारतातल्या रस्त्यांवर राज्य करण्यास सिद्ध आहे. रॉयल एन्फिल्डच्या इतिहासात पहिल्यांदाच अलॉय व्हील्स आणि ट्यूबलेस टायर्सचा वापर या बाईकमध्ये झाला आहे, ज्यामुळे एक वेगळाच डौल साधला जातो. गनस्लिंगर सीट, नवे ग्रॅब रेल्स आणि थोडा लहान केलेला रियर मडगार्ड यांच्यामुळे एक वेगळाच आणि स्वच्छ साधासरळ लूक येतो. काळ्या रंगातली रचना ही सायलेन्सर, फ्रंट फोर्क्स, साईड कव्हर्स, हेडलॅम्प्स कव्हर, इंडिकेटर्स आणि ग्रॅब रेल्सपुरती मर्यादित आहे. या पार्श्वभूमीवर टॅन्क्सचे आकर्षक रंग ठळकपणे उठून दिसतात. व्हील्सवरची रिमटेप आणि सीट कव्हर्सवरची शिवण या सौंदर्यात आणखी भर घालतात.

थंडरबर्ड एक्सचे धडधडते हृदय म्हणजे रॉयल एन्फिल्डचे युनिट कनस्ट्रक्शन इंजिन. याची माहिती खालीलप्रमाणे : थंडरबर्ड ५००एक्स : सिंगल सिलिंडर, एअर कूल्ड, ४९९सीसी इंजिन, इलेक्ट्रॉनिक फ्युएल इंजेक्शन सिस्टीम, उच्चतम पॉवर २७.२ बीएचपी@५२५०आरपीएम, उच्चतमटोर्क ४१.३एनएम @ ४०००आरपीएम

थंडरबर्ड ३५०एक्स : सिंगल सिलिंडर, एअर कूल्ड, ट्विनस्पार्क ३४६सीसी इंजिन, उच्चतम पॉवर१९.८ बीएचपी@५२५०आरपीएम, उच्चतमटोर्क २८एनएम @ ४०००आरपीएम

थंडरबर्ड एक्ससोबत आमच्याकडून शहरी मुशाफिरीच्या वेगळेपणाचा सन्मान म्हणून एक प्रेमाची भेट देत आहोत : एक छोटी गियर कॅपस्युल. थंडरबर्ड ५०० एक्स आणि थंडरबर्ड ३५०एक्स या भारतातल्या प्रमुख हायवे बाइक्सप्रमाणेच, थंडरबर्ड ही किरकोळ विक्रीसाठी उपलब्ध राहील.