सांस्कृतिक महोत्सवातुन एकतेचा संदेश

just pune things app
Share this News:

विशाल मुंदडा

पुणे – माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ चा अंतर्गत येणाऱ्या ३ वासातीगृहांचा सामुहिक सांस्कृतिक महोत्सव नुकताच कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडला. हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी शेकडोंच्या संख्येत पालक व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी क्यारम, चेस, क्रिकेट अशा विविध क्रीडा स्पर्धांमधील विजेत्यांना पारितोषिक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी पूर्णपणे हाताने बनविलेल्या “निरंतर प्रकाशन” या वार्षिक पुस्तकाचे पाहुण्यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. सांस्कृतिक महोत्सवाची थीम हि अतुल्य भारत ठेवून त्या माध्यमातून विविध राज्यातील संस्कृती हि नृत्य आणि नाटकाचा माध्यमातून दाखवून एकात्मतेचा संदेश दिला. विविध कला सदर करणाऱ्या विद्यार्थ्यानाही पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. सर्वात प्रतिष्ठेचा समजला जाणारा “बेस्ट स्टुडंत” हा पुरस्कार एच. आर. राठी मुलींचा वसतिगृहातून नम्रता मुंदडा, परिधी राठी, आर. बी. एच. आर. राठी मुलींचा वसतिगृहातून गौरी बिहाणी तर व्ही. एन. लाहोटी मुलाच्या वसतिगृहातून सुयश मालू, आशिष लाहोटी या विद्यार्थ्यांना देण्यात आला. यावेळी माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळाचा सुशीला राठी, कीर्ती लढा, नम्रता जाजू, लक्ष्मीकांत नावंदर इ. पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता माहेश्वरी हिने तर आभार प्रदर्शन कुणाल काकानि याने केले.