शुक्रवार पासून भोसरीत सुखी जीवनाचे गुपित या विषयावर व्याख्यान
प्रल्हाद वामनराव पै यांचे सुखी जीवनाचे गुपित या विषयावर व्याख्यान
पिपंरी (दि. 08 जानेवारी 2018) जीवन जगणे ही कला आहे. ती आत्मसात केल्याशिवाय जीवन सुखी, समृध्द व यशस्वी होणे शक्य नाही. व्यसनाधीन व्यक्ती स्वत:च्या हाताने स्वत:च्या संसाराला आग लावून आपल्या बायका पोरांना दु:खाच्या खाईत लोटतात हे प्रत्यक्ष पाहुण देखील अनेक युवक युवती व्यसनाकडे आकर्षित होत आहेत. त्यांना यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या जीवनविद्या मिशनच्या प्रबोधन चळवळीतून मिळावी व अवघा समाज सुखी व समृध्दी व्हावा. या उद्देशाने संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली 51 वा पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त जीवनविद्या मिशनचे प्रल्हाद वामनराव पै यांचे प्रबोधनपर व्याख्यान भोसरीत आयोजित करण्यात आले आहे. शुक्रवार दि. 12 जानेवारी ते रविवार दि. 14 जानेवारी 2018 पर्यंत ‘सुखी जीवनाचे गुपित’या विषयावर भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे सभागृहाशेजारील गाव जत्रा मैदानावर हा कार्यक्रम होईल. अशी माहिती कार्यक्रमाचे निमंत्रक आमदार महेश लांडगे यांनी सोमवारी पिंपरी येथे पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे, नगरसेवक ॲड. नितीन लांडगे, राहुल जाधव, शिक्षणमंडळाचे माजी सभापती भाईजान काझी, जीवनविद्या मिशनचे माजी अध्यक्ष शैलेश जोशी, सचिन बबनराव लांडगे, नगरसेवक कुंदन गायकवाड, संतोष लोंढे, उत्तम केंदळे, वसंत बोराटे, लक्ष्मण सस्ते, लक्ष्मण उंडे, विकास डोळस, राजेंद्र लांडगे, नगरसेविका भिमाबाई फुगे, सारीका लांडगे, यशोदा बोईनवाड, प्रा. सोनाली गव्हाणे, हिराबाई घुले, नम्रता लोंढे, सुवर्णा बुर्डे, योगिता नागरगोजे, सुजाता घोलप, साधना मळेकर, स्वीनल म्हेत्रे, अश्विनी जाधव, माजी नगरसेवक महादेव गव्हाणे, तसेच बाळासाहेब गव्हाणे, विजय फुगे, प्रताप मोहिते, संतोष जाधव, सचिन तापकिर, अजित बुर्डे, गणेश तापकीर, नंदू दाभाडे, बबन बोराटे, बापू घोलप, सुहास ताम्हाणे, केतन झोरे, सागर हिंगणे, किसन बावकर, मनोज गायकवाड आदी उपस्थित होते.
स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे म्हणाल्या की, महाराष्ट्र भरातून या प्रवचनासाठी भोसरीत येणा-या भाविकांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ पाणी पुरवठा, स्वच्छते विषयी सेवा सुविधा व इतर आवश्यक सुविधा पुरविण्यात येणार आहेत. शहरातील नागरिकांनी देखील सुखी जीवनाचे गुपित जाणून घेण्यासाठी या प्रबोधनपर व्याख्यानाचा लाभ घ्यावा. शैलेश जोशी यांनी माहिती देताना सांगितले की, कार्यक्रम स्थळी रोज सायंकाळी 7.30 वाजता प्रल्हाददादा वामनराव पै यांचे प्रबोधनपर व्याख्यान तसेच सायंकाळी 5 ते 6 यावेळेत संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ व संगीत जीवनविद्या, शुक्रवारी संद्गुरु श्री वामनराव पै यांच्या सत्शिष्यांची चक्री प्रवचने, सायंकाळी 6 वाजता अशोक नाईक व 6.30 वाजता अंकुश परहर यांचे प्रवचन होणार आहे. या तीन दिवसात दिड लाख साधक या ठिकाणी येतील. अशी माहिती जोशी यांनी दिली.