महावितरण कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी पाळणाघर
मुंबई, दि. ०५ सप्टेंबर २०१९ :-
महावितरणमध्ये कार्यरत असलेल्या महिला अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी महावितरणचे मुख्यालय असलेल्या प्रकाशगड येथे नुकतेच पाळणाघर सुरु करण्यात आले आहे.
महावितरणमध्ये मोठया संख्येने महिला कर्मचारी कार्यरत आहेत. या महिलांना नोकरी करताना आपल्या लहान मुलांच्या पालन-पोषणात अडचणी येऊ नयेत यासाठी महावितरणने सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून महिला कर्मचाऱ्यांच्या पाल्यांकरीता हे पाळणाघर सुरु केले आहे.
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री संजीव कुमार यांच्याहस्ते पाळणाघराचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी संचालक (मानव संसाधन) ब्रिगेडिअर (सेवानिवृत्त) पी.के.गंजू व कार्यकारी संचालक (मासं) श्री. चंद्रशेखर येरमे, कार्यकारी संचालक (विशेष प्रकल्प) श्री.प्रसाद रेशमे, कार्यकारी संचालक (वितरण) श्री.अरविंद भादीकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
