मानवी स्वभावानुसार स्त्री-पुरुष पात्रांचा अभिनय विषयावर नृत्यातून मार्गदर्शन मंगळवारी
पुणे : भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या स्कूल आॅफ परफॉर्मिंग आटर््सतर्फे ज्येष्ठ भरतनाट्यम् नृत्यांगना डॉ. स्वाती दैठणकर यांच्या दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा मंगळवार, दि. २६ व बुधवार दि. २७ रोजी सकाळी १०.३० वाजता स्कूल आॅफ परफॉर्मिंग आटर््सच्या सेमिनार हॉलमध्ये होणार आहे. शास्त्रीय नृत्य शिकणा-या विद्यार्थ्यांना कार्यशाळेत विनामूल्य सहभागी होता येईल, अशी माहिती केंद्राचे संचालक शारंगधर साठे यांनी दिली.
कार्यशाळेत शास्त्रीय नृत्यातील वय, अवस्था, परिस्थिती, स्वभाव, नातेसंबंध यानुसार स्री व पुरुष पात्रांप्रमाणे केला जाणारा अभिनय,भरतमुनी, अभिनवगुप्त व पाश्चिमात्य विचारवंत अॅरिस्टॉटल यांच्या रंजक सिध्दांतावर आधारित प्रात्यक्षिकांद्वारे भरतनाट्यम् नृत्याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच भरतनाट्यम् नृत्यप्रकारातील दुर्मिळ रचना देखील शिकण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. शास्त्रीय नृत्याचे विद्यार्थी, विद्यापीठाबाहेरील विद्यार्थी, अभ्यासक या कार्यशाळेत विनामूल्य सहभागी होऊ शकतात.
