चंद्रज्योत्सना पुस्तकाचे प्रकाशन

Share this News:

–    बाबासाहेब पुरंदरे यांचा सन्मान

–    विजय शिवतारे, तत्वज्ञ यशवंत पाठक, दिलीप शेठ, मंगेश कश्यप आणि चिञलेखा माने – कदम, आदि उपस्थित.

–    संतांचे विचार तरूणांपर्यंत पोहचणे गरजेचे :शिवतारे

पुणे : “सध्याच्या काळामध्ये शब्दांबरोबर दृकश्राव्य माध्यमाचे महत्व मोठे असून, ईतिहास आणि संस्कृति युवकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या माध्यमांचा प्रभावी वापर करणे गरजेचे आहे”, असे मत महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केले.

श्री कल्याण सेवक मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमामध्ये चंद्रतनयदादा यांच्यावरील चंद्रज्योत्सना या पुस्तकाचे प्रकाशन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्याचे जलसंपदा राज्यमंञी विजय शिवतारे, डॉ. गो.बं.देगलूरकर, तत्वज्ञ डॉ. यशवंत पाठक, डॉ. दिलीप शेठ, डॉ. मंगेश कश्यप आणि चिञलेखा माने – कदम, आदि उपस्थित होते.

यावेळी बाबासाहेब पुरंदरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यानंतर या स्तकाराला उत्तर देताना ते बोलत होते. पुरंदरे यांनी चंद्रतनयदादा आणि या पुस्तकाविषयी आपले मनोगत व्यक्त केले.

ते म्हणाले की, समाजावर दृकश्राव्य माध्यमाचा प्रभाव असून ते अधिकाधिक लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहचू शकते. या माध्यमातून चांगले विचार आणि संस्कार योग्य पद्धतीने लोकांपर्यंत लोकांपर्यंत पोहचतील. त्यामुळे हे महत्वाचे माध्यम असल्याचे त्यांनी सांगितले.

आपल्या संतांच्या विचारांना अनन्यसाधारण महत्व आहे आणि ते तरूण पिढीपर्यंत पोहोचले पाहिजेत, असे मत राज्याचे जलसंपदा राज्यमंञी विजय शिवतारे यांनी व्यक्त केले.

दरम्यान, डॉ. मंगेश कश्यप यांनी चंद्रतनयदादांवरील या पुस्तकात नमूद काही अनुभव श्रोत्यांसमोर मांडले. तसेच सध्याच्या समाजमनाचा उहापोह करत आपल्याकडे उपलब्ध असणारा संतांच्या विचारांचा अमूल्य ठेवा, अधिक खोलवर रूजवण्याचे काम असेच सुरू ठेवण्याची गरज देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.