MIT महाविद्यालयात अभाविप कार्यकर्त्यांचे उपोषण

Share this News:

उत्तम गुण मिळवून डायरेक्ट सेकण्ड इयर ला MIT महाविद्यालयात प्रवेश मिळवलेल्या साधना रांजणकर या SC कॅटेगरीतील विद्यार्थिनीकडून खुल्या वर्गाची फी महाविद्यालय प्रशासनाकडून मागण्यात आली. तिचाकडून 25000 रुपये बळजबरीने घेण्यात आले. तिला प्रवेश देण्याची मा. उच्च न्यायालयाची ऑर्डर असतानादेखील तिला प्रवेश  नाकारला. तिला परीक्षेतून मधूनच उठवण्यात आले. तिला मानसिक त्रास देण्यात आला. तिच्या आई वडिलांना वेळोवेळी अपमानित करण्यात आले. गेली 3 वर्षे तिच्यावर अन्याय होत आहे.दि. 17 ऑगस्ट 2016 रोजी श्री. मंगेश कराडांना साधना,तिचे आई वडील भेटायला गेले होते. त्यावेळी तिच्या वतीने विनंती करण्यासाठी गेलेल्या अभाविप कार्यकर्त्याला सुरक्षरक्षकांकडून मारहाण करण्याचे आदेश मंगेश कराड यांनी दिले. त्याचबरोबर तिच्या आईवडिलांना शिवीगाळ देखील केली.

याविरोधात अभावीपने लढा पुकारला आहे. MIT महाविद्यालयाच्या बाहेर उपोषण सूरु केले आहे.

या विषयात मा. मुख्यमंत्र्यांना देखील अभाविप ने निवेदन दिले आहे.
अभाविप च्या मागण्या पुढीलप्रमाणे :

1. साधना रांजणकर या विद्यार्थिनीला व तिच्या आई वडिलांना शिवीगाळ करणाऱ्या मंगेश कराड यांच्यावर आट्रॉसिटी चा गुन्हा दाखल करावा.
2. कार्यकर्त्याला मारहाण करावी असा आदेश देणाऱ्या, विद्यार्थ्यांशी उद्धटपणे वागणाऱ्या मंगेश कराडांची हकालपट्टी करावी.
3. कास्ट व्हॅलिडीटी प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना 6 महिन्यात मिळावे अशी तरतूद सेवा हमी कायद्यात करावी. व न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.
4.सदर प्रकाराबाबत विद्यार्थिनीला, तिच्या आई वडिलांना व अभाविप कार्यकर्त्याला जो त्रास सहन करावा लागला त्याबद्दल संबंधितांनी जाहीर माफी मागावी.