सीए स्थापना दिवसानिमित्त ‘आयसीएआय’तर्फे दोन दिवस रक्तदान शिबिराचे आयोजन
पुणे : सनदी लेखापाल (सीए) स्थापना दिवसानिमित्त दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) आणि वेस्टर्न इंडिया चार्टर्ड अकाऊंटंटस स्टुडंट्स असोसिएशन (विकासा) यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार (दि. ३०) व सोमवार (दि. १ जुलै) या दोन दिवशी शहरातील १० ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. रविवारी (दि. ३०) सकाळी ९.३० ते १.३० वाजेपर्यंत राठी अँड राठी कंपनी, कमल कीर्ती, सिंहगड रस्ता, पु. ल. देशपांडे उद्यानाजवळ हे शिबीर होणार आहे.
सोमवारी (१ जुलै) सकाळी ९.३० ते १.३० या वेळेत १) एसआरपीए अँड असोसिएट्स, प्राईड आयकॉन, कोलंबिया आशिया हॉस्पिटल जवळ, खराडी, २) एसपीसीएम, सेंट्रल पॉईंट, मित्र मंडळ, पर्वती ३) पुणे सिटी सीपीई स्टडी सर्कल, महात्मा फुले हॉल, घोले रस्ता, ४) किर्तने अँड पंडित, किमया हॉटेल, कर्वे रस्ता, ५) डीएमकेएच, फॉरचुन हाऊस, बाणेर-पाषाण लिंक रस्ता, ६) पीएसएसी अँड असोसिएट्स, द लीला हाऊस, केके मार्केट, सातारा रस्ता, ७) बीडीओ इंडिया, कल्याणी नगर, ८) फडके संकुल, टिळक रोड ९) आयसीएआय भवन, बिबवेवाडी येथे हे रक्तदान शिबीर होणार आहे. शहराच्या विविध भागात होत असलेल्या या शिबिरांमध्ये सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन ‘आयसीएआय’ पुणे शाखेच्या अध्यक्षा सीए ऋता चितळे यांनी केले आहे.