रिपब्लिकन श्रमिक सेनेच्या  शाखेचे मार्केटयार्ड येथे उद्घाटन

Share this News:
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रणित रिपब्लिकन श्रमिक सेनेच्या शाखेचे मार्केटयार्ड येथे नुकतेच उद्घाटन झाले. रिपब्लिकन श्रमिक सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कामगार नेते महेश शिंदे यांच्या हस्ते गुलटेकडी मार्केटयार्ड परिसरातील गेट क्रमांक एक येथे ही शाखा सुरु झाली आहे. श्रमिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी स्थापण्यात आलेल्या रिपब्लिकन श्रमिक सेनेच्या टप्प्याटप्याने ७० पेक्षा अधिक शाखा उघडण्यात येणार आहेत. यावेळी रिपब्लिकन श्रमिक सेनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष गौतम माने, जिल्हा अध्यक्ष बापू शिंदे, शहराध्यक्ष निलेश थोरात, महिला अध्यक्षा ज्योती खरात, भोसले ताई, पश्चिम महाराष्ट्रच्या अध्यक्षा वैशाली शिंदे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी महेश शिंदे म्हणाले, “गोरगरीब, कष्टकऱ्यांचे काम करणारे सरकार सत्तेवर आले पाहिजे. नीतिमत्ता असणाऱ्या लोकांचे सरकार आणण्यासाठी रिपब्लिकन श्रमिक सेना येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये मोठया प्रमाणात काम करणार आहे. गोरगरिब, कष्टकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावन्यासाठी, कामगारांवरील अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी आम्ही काम करत आहोत. येत्या काळात लोकांनी एकत्रित येऊन जातीयवादी आणि अन्याय करण्याऱ्या शक्तीचा विरोध केला पाहिजे.”