आतापर्यंत 5 लाख 60 हजार पुरग्रस्त नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात प्रशासनाला यश

Share this News:

मुंबईदि. 13/8/2019 : राज्यातील पूरपरिस्थितीमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत राज्यातील 5 लाख 60 हजार 953 पुरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविण्यात प्रशासनाला यश आले आहे. शासनाचे आपत्ती नियंत्रण कक्षस्थानिक प्रशासनाचे अधिकारीकर्मचारी यांच्यासह राज्य व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दललष्करनौदलवायूदलतटरक्षक दलाचे जवान कार्यरत आहेतअशी माहिती मंत्रालयातील राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाने दिली.

स्थानिक प्रशासनाबरोबरच सांगलीकोल्हापूर येथे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाचे 22राज्य आपत्ती व्यवस्थापन दल 3,  तसेच नौदलाच्या 18तटरक्षक दलाचे 8आर्मी 17उपलब्ध बोटी 163  अशी पथके कार्यरत आहेत.

आतापर्यंत कोल्हापूर येथील 3 लाख 36 हजार 297 तर सांगली येथील 1 लाख 74 हजार 485 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

नागरिकांना तात्पुरता निवारा म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात 210 तर सांगली जिल्ह्यात 168 तात्पुरता निवारा केंद्रे उभारण्यात आली आहेत. तेथील लोकांना स्वच्छ पाणीजेवणाची व्यवस्थाऔषधोपचार उपलब्ध करून दिले जात आहेत.  कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील 61 हजार 27 जनावरांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

बाधित गावे व कुटुंबे

कोल्हापूर जिल्ह्यात पूरबाधित गावे-321बाधित कुटुंबे-81 हजार 88 तर सांगली जिल्ह्यातील पूरबाधित गावे-104 व कुटुंबसंख्या-34 हजार 917 अशी आहे. या सर्व गावात प्रशासनाच्या पथकांबरोबर इतर सर्व आपत्ती निवारण दलांचे बचाव कार्य सुरू आहे.

पूरपरिस्थितीबद्दल राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्यात सतत संपर्क आहे. मंत्रालयातील आपत्ती नियंत्रण कक्ष चोवीस तास कार्यरत असून वेळोवेळी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यात येत आहे.

मंत्रालयातील राज्य आपत्ती नियंत्रण कक्षातील हेल्पलाईनवर आणि सोशल मीडियावर आलेल्या संदेशावर तत्काळ प्रतिसाद देऊन स्थानिक प्रशासनाला सूचना देऊन पूरग्रस्तांना मदत करण्यात येत आहे.

राज्यातील इतर बाधित गावे

सातारा-123 गावे (बचाव केलेल्या व्यक्ती-10755)ठाणे- 25 गावे (बचाव केलेल्या व्यक्ती-13104)पुणे- 108 गावे (बचाव केलेल्या व्यक्ती-13500)नाशिक-05 गावे (बचाव केलेल्या व्यक्ती-3894)पालघर-58 गावे (बचाव केलेल्या व्यक्ती-2000)रत्नागिरी- 12 गावे (बचाव केलेल्या व्यक्ती-687)रायगड-60 गावे (बचाव केलेल्या व्यक्ती-3000)सिंधुदुर्ग-46 गावे (बचाव केलेल्या व्यक्ती-3231). असे एकूण कोल्हापूर आणि सांगली शहरासह 71 बाधित तालुके तर 862 गावे आहेत.