मुँह में राम और बगल मे छुरी, हेच भाजपचे धोरण

Share this News:

– दुष्काळाच्या प्रश्नावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची सरकारवर टीका

मुंबई- दि.२२: मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारच्या दुष्काळाच्या अनास्थेवर ताशेरे ओढले आहेत. दुष्काळाबाबत सरकार गंभीर नसल्याचा निकाल न्यायालयाने दिला आहे. दुष्काळनिवारणासाठी फक्त घोषणा करण्यावर सरकारचा भर आहे. मात्रअमरावती विभागातील चार जिल्ह्यांत सुमारे साडेचार हजार गावात दुष्काळ असतानाही सरकारने दुष्काळ जाहीर न करता तो दाबण्याचा प्रयत्न केला असून दुष्काळाबाबत  मुँह मे राम और बगल मे छुरीहेच भाजपचे धोरण असल्याची टीका मुंडे यांनी केली.  न्यायालयाच्या निकालाचा आधार घेत आज विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत २८९ चा स्थगन प्रस्ताव आणून यावर चर्चा करण्याची मागणी केली होती. मात्र सभापतींनी ही मागणी फेटाळून लावली.