मुलांचे भवितव्य अंधकारमय करणारा मटका जुगार बंद करा – सुमनताई पाटील

Share this News:

मुंबई – दि.30 : स्व.आर. आर. पाटील यांनी राज्यात डान्सबारबंदी करून हजारो संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचवले होते, आज त्यांच्या पश्चात पत्नी आमदार सुमनताई पाटील यादेखील त्यांचाच वारसा पुढे चालवत तासगाव कवठें महांकाळ येथील  मुलांना मटक्याचे व्यसन लागू नये म्हणून लढा देत आहेत. तासगाव कवठे-महांकाळमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररीत्या मटका जुगार सुरू आहे. गोरगरीब मटक्याच्या आहारी गेले असून शाळकरी मुलांनाही जुगाराचे व्यसन जडले आहे. या व्यसनामुळे मुलांचे भवितव्य अंधकारमय होण्याची भीती आहे. त्यामुळे या भागात सुरू असलेला मटका त्वरीत बंद केला जावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सुमनताई पाटील यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे विधानसभेत केली.

    तासगाव कवठे-महांकाळमध्ये बेकायदेशीररीत्या मटका सुरू असूनही पोलिस प्रशासनाने त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केले आहे. याठिकाणी राजरोसपणे लाखो रूपयांचा मटका खेळला जात आहे. ही बाब सुमनताई पाटील यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे विधानसभेत निदर्शनास आणली. हा मटका जुगार चालवणाऱ्यांवर कधी कारवाई झाली तर ती एक-दोन हजारापर्यंतच दंड आकारला जातो. मटका चालवणाऱ्या एजंटना कधी अटक झाली तर दुसऱ्या दिवशी ते लगेच सुटतात. त्यांना चाप बसण्यासाठी हा मटका जुगार त्वरीत बंद करण्यात यावा अशी मागणी पाटील यांनी केली आहे.