माईर्स एमआयटीच्या पॉलिटेक्निक कडून कर्तव्यदक्ष पोलिसांना वाटले 8000 पाणी बॉटल
पुणे, दिनांक, 24 एप्रिल: संपूर्ण जगामध्ये थैमान घातलेल्या जिवघेण्या कोरोनाला पुण्यात प्रतिबंध घालण्यासाठी पुणे पोलीस दलातील सर्व कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहेत. त्यांच्याप्रती सामाजिक बांधिलकी जपत माईर्स एमआयटी तंत्रनिकेतन मधील सर्व शिक्षक व विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने कोथरूड येथील शास्त्रीनगर पोलीस चौकीला आठ हजार पाणी बॉटल वितरित केले.
हा उपक्रम एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड व कार्यकारी अध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांच्या मार्गदर्शनात पार पाडण्यात आला. या वेळी विद्यार्थी असोसिएशनचे प्रतिनिधी तनिष कुलकर्णी व निरव परवाल यांनी पुढाकार घेतला होता. विध्यार्थीच्या या कार्याबद्दल संस्थेच्या प्राचार्य डॉ. रोहिणी काळे ,सर्व विभाग प्रमुख व शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले. अशी माहिती एमआयटी तंत्रनिकेतनचे समन्वयक प्रा. डॉ. सुनील कराड यांनी दिली.