नागपूर शहरासह जिल्ह्याच्या सुरक्षेसाठी चार हजार पोलीसांची नव्याने भरती करण्यात यावी- आ.प्रकाश गजभिये.

just pune things app
Share this News:

मुंबई – दि.5 :वाढत्या गुन्हेगारीमुळे नागपूर शहरासह जिल्ह्यातील कायदा व सुव्यस्था बिघडत आहे. सध्या जिल्ह्याच्या सुरक्षतेच्या दृष्टीने चार हजार पोलिसांची आवश्यकता असताना राज्य सरकार केवळ 161 पदांची पोलिस भरती करीत  आहे. त्यामुळे राज्याच्या उपराजधानीचे शहर असलेल्या नागपूर शहरासह संपूर्ण जिल्ह्याची सुरक्षा रामभरोसे राहणार आहे. तरी कायदा व सुव्यस्थेची बिघडलेली स्थिती लक्षात घेता जिल्ह्यात नव्याने चार हजार पोलीसांची भर्ती करण्यात यावी ,अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार प्रकाश गजभिये यांनी विधान विधानरिषदेत विशेष उल्लेखाव्दारे केली.

यावेळी बोलताना ते म्हणाले नागपूर शहरात दिवसेंदिवस अपराधाच्या संख्येत  वाढ होत आहे. नागपूर पोलिस पोलीसांच्या कमी संख्येमुळे गुन्हेगारीला आळा घालण्यास अपयशी ठरत आहेत. सद्या नागपूर पोलिस आयुक्तालया अंतर्गत 7 हजार 50 पोलिस अधिकारी व कर्मचारी आहेत. त्यात 1100 महिला कर्मचारी आहेत. 2011 मध्ये नागपूर शहराची लोकसंख्या 24 लाख होती त्या अनुषंगाने 10000 पोलिसांचे बळ पुरेसे होते परंतु आज नागपूर शहराची लोकसंख्या 34 लाख आहे.त्यामुळे नागपूर शहराच्या कायदा व सुरक्षतेच्या  दृष्टीने पुन्हा 4000 पोलिसांची गरज आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात पुरेसे पोलिस बळ नाही, तसेच हिंगणा व कामठी हे दोन तालुके यांचा समावेश पोलिस आयुक्तालय नागपूर येथे करण्यात आले आहे. नागपूर जवळील बुटीबोरी पर्यंत नागपूरची हद्द वाढविण्यात येणार आहे. आता 4000 पोलिस कर्मचाऱ्यांची भरती न झाल्यामुळे सर्व कामाचा बोजा सध्या असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांवर पडत आहे.

तसेच हिवाळी अधिवेशनामध्ये सुध्दा हजारो पोलिस राज्यातून बोलवावे लागतात. नागपूर शहर हे उपराजधानीचे शहर असून  मुख्यमंत्री सुध्दा नागपूरचेच आहेत.तसेच अति महत्वाच्या व्यक्तींची नेहमीच  या शहरात वर्दळ असल्यामुळे पोलिसांची संख्या वाढविणे गरजे असल्याचे आमदार प्रकाश गजभिये यांनी  यावेळी सांगितले.