मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींना क्लीनचीट देणे म्हणजे शहिद हेमंत करकरे यांचा अपमान – नवाब मलिक

Share this News:

मुंबई – दि. 13 : 2008 साली घडलेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास हा तत्कालीन एटीएस प्रमुख हेमंत करकरे हे करीत होते. या प्रकरणाचा तपास करुन त्यांनी साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहित सह इतर लोकांना अटक केली होती. त्यावेळी या प्रकरणातील आरोपींच्या सुटकेसाठी भाजप नेते लालकृष्ण आडवाणी व सध्याचे गृहमंत्री हे साठी पंतप्रधानाना साकडे घालत होते. त्यावेळी हेमंत करकरे यांनी या सर्व प्रकरणाचा खुलासा पंतप्रधान कार्यालयासमोर केला होता. हेमंत करकरे हे या प्रकरणाचा तपास करीत असताना या बॉम्बस्फोटातील आरोपींवर पुष्पवृष्टी करण्याचे काम भाजपचे लोक करीत होते.

केंद्रातील सत्ता आल्यानंतर सध्याच्या एनआयएच्या प्रमुखांना 1 वर्षाची मुदतवाढ देऊन सत्तेचा दुरुपयोग करुन या प्रकरणातील आरोपींना क्लीनचीट देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. हे कृत्य म्हणजे या देशातील एक कर्तबगार अधिकारी, जे 26/11 च्या हल्ल्यात शहिद झाले होते, त्या शहिद हेमंत करकरे यांनी केलेल्या तपासावर अविश्वास दाखविण्याचा प्रकार असून त्यांचा हा अपमान आहे. सरकारच्या दबावानेच हे कृत्य घडले असून ते देशाच्या दृष्टीने घातक असल्याचे नवाब मलिक
यांनी म्हटले आहे.