पुणेकरानां मिळणार नवीन रोजगाराची संधी
आज सुमारे 2500 गरजवंतांनी घेतला लाभ
पुणे(प्रतिनिधी):-नोकरी क्षेत्रातील नामवंत “जॉब मंडी-ट्रेनिंग अँड प्लेसमेंट”यांनी मिटकॉन च्या मार्गदर्शना खाली “भव्य रोजगार मेळावा”याचे सदर उदघाटन मा. आमदार विनायक मेटे यांच्या हस्ते आज झाले.यावेळी मिटकॉन चे डॉ प्रदीप बावडेकर व अभिनंदन थोरात यांनी उपस्थित असलेल्या सुमारे 2500 नोकरी इच्छुकांना मार्गदर्शन केले.
हा रोजगार मेळावा दि.13 व 14 जून रोजी पि. व्ही.जी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग ,मुक्तांगण पर्वती पुणे येथे आयोजले आहे.
सदर मेळाव्यात कुशल व अकुशल कामगारांची उपलब्धता आणि खाजगी क्षेत्रातील कंपन्यांची असलेली मागणी यामध्ये समन्वय साधण्याचे काम जॉब मंडी तर्फे करण्यात येणार असल्याचे प्रवर्तक अमित जवाजी यांनी सांगितले.तसेच या मेळाव्यात सुमारे 50 ते 60 कंपन्यांचे कर्मचारी मुलाखती व निवडी साठी उपस्थित असून त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळणार आहे आणि निवडीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्यांना त्वरित कंपनी पेरोल वर घेणार आहे असे हि ते म्हणाले.
वाढत्या बेरोजगारीला आळा बसण्यासाठी हि प्रक्रिया अत्यंत सुनियोजित व पारदर्शक ठरणार आहे तरुणांना जास्तीत जास्त ह्या मेळाव्यात येऊन आपल्याला योग्य ती संधी मिळणार आहे त्याचा लाभ घ्यावा