ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांच्यासमवेत चंद्रकांत दादा पाटील यांचा संवाद

IMG-20191007-WA0018.jpg
Share this News:

7 /10/2019- भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली.

विज्ञान तंत्रज्ञानाच्या जोरावर महाराष्ट्र अधिक प्रगत कसा करता येईल आणि बुद्धिमत्ता व ज्ञान कौशल्याच्या जोरावर तरूणाईला संपन्न कसे करता येईल अशा विविध मुद्द्यांवर यावेळी उभयतांमध्ये अनौपचारिक चर्चा झाली. तसेच या प्रसंगी चंद्रकांत दादा पाटील यांनी डॉ. माशेलकर यांचे आशीर्वाद देखील घेतले.