विधानसभा निवडणुकीसाठी पुणे जिल्हयातील 246 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात

Share this News:

पुणे दि.7: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 मध्ये पुणे जिल्हयातील 21 विधानसभा मतदार संघात 246 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एकूण 373 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केली होती, त्यापैकी 127 उमेदवारांनी माघार घेतली असून 246 उमेदवार निवडणूक लढविणार आहेत.

 

विधानसभा मतदार संघ निहाय निवडणूकीच्या रिंगणातील उमेदवारांची संख्या (कंसात माघार घेतलेल्या उमेदवारांची संख्या) खालीलप्रमाणे आहे.

 

जुन्नर -11 (1), आंबेगाव 6 (3), खेड-आळंदी -9 (4), शिरुर -10 (5), दौंड-13 (4), इंदापूर-15 (15), बारामती-10 (2), पुरंदर – 11 (5), भोर-7 (4), मावळ-7 (3), चिंचवड-11 (3), पिंपरी-18 (13), भोसरी-12 (6), वडगावशेरी-12 (5), शिवाजीनगर 13 (0), कोथरुड-11 (10), खडकवासला-7 (2), पर्वती-11 (4), हडपसर-14 (5), पुणे कॅन्टोमेंट-28 (30), कसबा पेठ-10 (3) अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे.