राज्यात आतापर्यंत १५ कोटी ३० लाख ४१ हजार २११ वृक्षलागवड,  ३६ लाख ५९ हजार ८५६ लोकांचा सहभाग

Share this News:

मुंबई, दि. २४ : राज्यात ३३ कोटी वृक्षलागवडीच्या संकल्पपूर्ती मध्ये सर्वोत्तम काम करणाऱ्या जिल्ह्यांना तसेच शासकीय विभागांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाईलतसेच  या कामाची दखल घेऊन त्यांच्या जिल्हा वार्षिक योजनेमध्ये अधिकचा निधी उपलब्ध करून दिला जाईल असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले

आज त्यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्तजिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून संवाद साधला आणि ३३ कोटी वृक्षलागवडीचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वन राज्य मंत्री परिणय फुकेविभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी वृक्ष लागवडीच्या नियमित बैठका घ्याव्यातहे काम शासकीय काम आहे असे त्याकडे न पहाता कर्तव्यभावनेने ते पूर्णत्वाला न्यावे असे आवाहन करून श्री. मुनगंटीवार म्हणाले कीआपण या मिशनमध्ये आमदारांच्या अध्यक्षतेखाली समित्यांची स्थापना केली आहेत्यांनाही या मिशनमध्ये सहभागी करून घ्यावे.

वृक्ष आराखड्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद

जसा  शहरांचा विकास आराखडा तयार केला जातो तसा प्रत्येक जिल्ह्याचा वृक्ष आराखडा तयार झाला पाहिजे असे सांगून वनमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले कीवर्षभरात नगरपालिका आणि महानगरपालिकांनी असे प्लान तयार करावेतज्या नगरपालिका किंवा महानगरपालिका असा आराखडा तयार करतील त्यांना पुढच्या अर्थसंकल्पात हा वृक्ष आराखडा अंमलात आणण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल.

राष्ट्रीयराज्य  आणि जिल्हा महामार्गाच्या दुतर्फा वृक्षलागवड करण्याला प्राधान्य देण्यात यावेपुढील पाच वर्षात अशा पद्धतीने वृक्षलागवड पूर्णत्वाला जाईल याची दक्षता घ्यावी असेही ते म्हणाले.  केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा १२५ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहेत्यात महाराष्ट्राचे सादरीकरणही ते पहाणार आहेत. त्याचे नियोजन ही प्रत्येक जिल्ह्याने करावेसार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी यात पुढाकार घ्यावाअशा सूचनाही त्यांनी दिल्या.

प्रत्येक जिल्ह्यात एक वनौषधी रोपवाटिका

प्रत्येक जिल्ह्याला  कोटीच्या आसपास खनिज निधी आहेयातून जिल्हाधिकारी यांनी वनौषधी रोपवाटिका तयार करण्याला प्रोत्साहन द्यावेप्रत्येक जिल्ह्यात वनौषधीची एक तरी रोपवाटिका विकसित करावे असे निर्देशही त्यांनी दिले.

राज्यात १५ कोटी हून अधिक वृक्षलागवड

राज्यात १ जुलै ते ३० सप्टेंबर २०१९ या तीन महिन्याच्या कालावधीत ३३ कोटी वृक्षलागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. आजपर्यंत राज्यात १५ कोटी ३० लाख ४१ हजार २११ वृक्षलागवड झाली आहे. ही वृक्षलागवड उद्दिष्टाच्या ४५ टक्के इतकी आहे. यात ३६ लाख ५९ हजार ८५६ लोकांनी सहभाग घेतला आहे अशी माहिती वनमंत्र्यांनी दिली.

जे जे उत्तम आहे ते स्वीकारता आले पाहिजे  असे सांगून हरित महाराष्ट्राच्या संकल्पनेला वेग देण्यासाठी ज्या नावीन्यपूर्ण योजना राबविल्या जात आहेत त्याचा आदर्श इतर जिल्ह्यांनी घ्यावा व आपल्या जिल्ह्यातही वृक्षलागवडीच्या कामाला वेग द्यावात्यासाठी नियमित बैठका घेऊन पाठपुरावा करावा. माणूस जेव्हा प्रयत्नांची पराकाष्ठा करतो तेंव्हा ईश्वरही त्याला तथास्तू म्हणत आशीर्वाद देतो हे लक्षात घेऊन सर्वांनी या ईश्वरीय कामात मनापासून योगदान द्यावे, अशी अपेक्षाही वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केली.

वृक्षलागवड ऑनलाईन नोंदवा- विकास खारगे

राज्यात होणारी वृक्षलागवड फोटोसह ऑनलाईन पद्धतीने अक्षांश रेखांशासह संकेतस्थळावर नोंदवा असे आवाहन  वन विभागाचे प्रधानसचिव विकास खारगे यांनी केले. ते म्हणाले कीजे जिल्हेजे विभाग वृक्षलागवडीत मागे राहिले आहेत त्यांनी त्यांची उद्दिष्ट्ये दिलेल्या वेळेत पूर्ण होतील याची काळजी घ्यावीयासाठी दर आठवड्याला बैठका घ्याव्यातचांगल्या कामांना व्यापक प्रसिद्धी द्यावी.

वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करणारच जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली कटिबद्धता

काही जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने ते जिल्हे वृक्षलागवडीत थोडे मागे राहिले असले तरी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करणार आणि लावलेले वृक्ष जगवणार ही भावना जिल्हाधिकाऱ्यांनी व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या चर्चेदरम्यान व्यक्त केली.  वृक्षलागवडीप्रतीची कटिबद्धता त्यांच्या बोलण्यातून दिसून येत होती. अनेक जिल्ह्यांनी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवित लोकसहभाग मिळवण्यात मोठे यश मिळवले आहे. अटल आनंद घन वन योजनेच्या अंमलबजावणीतही अनेक जिल्ह्यांनी पुढाकार घेतला आहे. औरंगाबाद विभागीय आयुक्तांच्या निवासस्थानामागे ३.५ हेक्टरवर अटल आनंद घन वन योजनेत  २५० प्रजातींची २५ हजार रोपे लावली गेली आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील भुकंपग्रस्त गावांच्या जमीनीवर गावठाणे तयार केली गेली. सामाजिक वनीकरण विभागाला ती हस्तांतरीत करण्यात आली. या ८५ पैकी ६६.६० हेक्टरवर वृक्षलागवड होणार आहे अशी माहिती चर्चेदरम्यान देण्यात आली.

कोणतेही कारण देणार नाही

आम्ही कमी पावसाचे किंवा अन्य कोणतेही  कारण देणार नाहीआम्ही नक्की उद्दिष्टापेक्षा अधिक वृक्षलागवड करू आणि लावलेले वृक्ष जगतील याची काळजी घेऊ, असा विश्वास औरंगाबादचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी या चर्चेदरम्यान बोलून दाखवला ते म्हणाले की अनेक ठिकाणी वृक्षलागवडीमुळे अधिकाऱ्यांची आठवण होते. इतके उत्तम काम त्यांनी हरित महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी केले आहे. त्याच कटिबद्धतेने पूर्ण विभाग वृक्षलागवडीत काम करील. त्यांनी उस्मानाबादसह चांगले काम करणाऱ्या जिल्ह्यांचा आवर्जून उल्लेख केला. औरंगाबाद शहरात १०० ठिकाणी अटल आनंद घन वन योजनेतून डेन्स फॉरेस्ट निर्माण केले जात आहेत्याचे नियोजन पूर्ण झाले आहे अशी माहिती दिली.  औरंगाबाद जिल्ह्यात वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनात खूप उत्तम काम झाल्याबद्दल त्यांनी वन विभागाच्या कामाचा आवर्जून उल्लेख केला.  त्यांनी शेतकऱ्यांसह स्थानिकांना वन्यजीव संवर्धनात सहभागी करून घेत दर तीन ते चार कि.मी वर वन्यजीवांसाठी पाणपोई सुरु केल्याचे व हेच डिझाईन इतर जिल्ह्यांमध्ये राबविणार असल्याचे सांगितले.