ऑल इंडिया क्वामी तन्झिमच्या वतीने गरजू २०० कुटुंबांना अन्नधान्य वाटप

Share this News:

पुणे 15/04/2020: लॉकडाऊनमुळे असंख्य गरीब नागरिकांची अडचण झाली असल्याने येरवडा भागातील गरजू आणि बेघर नागरिकांना ऑल इंडिया क्वामी तन्झिम या संस्थेच्या अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.

संस्थेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. हाजी जाकीर शेख यांच्या नेतृत्त्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. येरवड्यातील लक्ष्मीनगर, जयजवान नगर, नागपूर चाळ, ताडीवाला रोड या भागातील नागरिकांना अन्नधान्याचे कीट वाटण्यात आले.

येरवड्यात येरवडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक युनूस शेख यांच्या हस्ते, तर लक्ष्मीनगरमध्ये सहायक पोलिस निरीक्षक समीर करपे, सायबर तज्ज्ञ रियाज नदाफ आणि जर्मन बेकरीचे मालक मनोज खरोसे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. नागपूर चाळ येथे अशोक इटकर यांच्या हस्ते, येरवडा बाजार येथे सोहेल अन्सारी, अझिम शेख यांच्या हस्ते, तर पर्णकुटी येथे युनुस अन्सारी यांच्या हस्ते अन्नपदार्थ्यांचे वाटप करण्यात आले.

‘लॉकडाऊनमुळे अनेक नागरिकांची अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे पोलिसांच्या सहकार्याने गरीब आणि बेघर नागरिकांना सुमारे २०० कुटुंबियांना अन्नधान्याचे कीट वाटण्यात आले’ असे डॉ. हाजी जाकीर शेख यांनी सांगितले.