भोसरीतील वैष्णव विचार समितीच्या सभा मंडपाचे महापौर जाधव यांच्या हस्ते भूमिपूजन

Share this News:

पिंपरी, 13 सप्टेंबर – धार्मिक वारसा जपण्यासाठी आमदार महेश लांडगे यांच्या आमदार निधीतून वैष्णव विचार किर्तन महोत्सवासाठी भोसरी गावठाणातील मुंजोबा तरुण मंडळाच्या शेजारील जागेत प्रशस्त असे सांस्कृतीक भवन बांधण्यात येणार आहे. या भवनातील सभा मंडपाच्या कामाचे महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते नुकतेच भूमिपजून करण्यात आले. आगामी तीन महिन्यात हे काम पूर्ण केले जाणार आहे.

 

यावेळी वस्ताद किसनराव लांडगे, आमदार महेश लांडगे, नगरसेविका सोनाली गव्हाणे, सारिका लांडगे, भीमाबाई फुगे, नगरसेवक संतोष लोंढे, रवी लांडगे, सागर गवळी, नितीन लांडगे, संतोष लोंढे, माजी नगरसेवक पंडित गवळी, सुदामराव लांडगे, दशरथ लांडगे, वैष्णव विचार किर्तन महोत्सवाचे अध्यक्ष भाऊसाहेब लांडे, उपाध्यक्ष देवीदास फुगे, व्यवस्थापक राजाभाऊ फुगे, नंदुशेठ लांडगे, श्यामराव फुगे उपस्थित होते.

 

वैष्णव विचार किर्तन महोत्सवासाठी सांस्कृतीक भवन बांधण्याची मागणी पदाधिका-यांनी आमदार महेश लांडगे यांच्याकडे केली होती. आमदार महेश लांडगे यांनी आमदार निधीतून काम करण्याचे ठरविले. त्यानुसार सांस्कृतीक भवन बांधण्यात येणार आहे. वैष्णव विचार किर्तन महोत्सवासाठी एक प्रशस्त हॉल, टाळ, पखवाज असे साहित्य ठेवण्यासाठी दोन स्वतंत्र खोल्या असणार आहे. स्वच्छतागृह असणार आहे. दोन ते तीन महिन्यात हे काम पूर्ण करण्याचा मानस आहे.

 

आमदार लांडगे म्हणाले, ‘भोसरीगावाचे गावपण जपणे आवश्यक आहे. त्यासाठी किर्तन महोत्सवासारखे धार्मिक कार्यक्रम, महोत्सव झाले पाहिजेत. या कार्यक्रमांसाठी सांस्कृतीक भवन बांधण्याचे काम हाती घेतले आहे. वेळेत ते काम मार्गी लावले जाईल’.

 

महापौर राहुल जाधव म्हणाले, ‘सांस्कृतिक कामाला आमदार लांडगे सातत्याने प्राधान्य देतात. त्यांच्या आमदार निधीतून हे सांस्कृतिक भवन बांधण्यात येणार आहे’