रक्तदानात पुणे देशात अव्वल: खा. वंदना चव्हाण

Share this News:

पुणे :

‘शिवप्रजाराज्यम ‘,’ग्रीन रिव्हॉल्युशन ‘ तर्फे नागरी गौरव सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला असून राम बांगड(रक्तमहर्षी गौरव सन्मान),राम बोरकर(लोकसेवक गौरव सन्मान ) ,स्वप्नील नाईक(युवा गौरव सन्मान ) यांचा सन्मान करण्यात आला . खासदार एड वंदना चव्हाण यांच्या हस्ते हा सन्मान झाला. महिला गृह उद्योग लिज्जत पापड चे व्यवस्थापक सुरेश कोते आणि एड . प्रतापसिंह परदेशी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. हा कार्यक्रम उद्यान प्रसाद मंगल कार्यालय येथे २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता झाला.

‘रक्तदानात महाराष्ट्र देशात अव्वल स्थानावर आहे ,आणि महाराष्ट्रात पुणे प्रथम स्थानावर आहे ,कारण कार्यकर्ते आणि संस्थांचे मोहळ पुण्यात आहे . पुण्याने अन्य वैशिष्ट्यांप्रमाणे हेही वैशिष्ट्य जपून ठेवावे . कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्याचा सन्मान करण्याची ही प्रथा अनोखी असून कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी समाजाने पुढे येऊन कायमस्वरूपी व्यवस्था उभारायला हवी ‘,असे उद्गार खा . वंदना चव्हाण यांनी यावेळी बोलताना काढले .

सुरेश कोते म्हणाले ,’रक्तदान करणे ही खरी मानवसेवा असून निरपेक्ष वृत्तीने समाजसेवा करण्याची वृत्ती वाढली पाहिजे ‘

‘रक्ताचे नाते ‘ संस्थेचे राम बांगड ,मनसे उपाध्यक्ष राम बोरकर ,स्वप्नील नाईक यांनी समाजकार्यातील अनुभव सांगितले .

‘शिवप्रजा राज्यम ‘ चे अध्यक्ष अनंत घरत ,’ग्रीन रिव्होल्यूशन ‘ चे अध्यक्ष किशोर रजपूत यांनी स्वागत केले. निमंत्रक ललित राठी यांनी आभार मानले. ‘वनराई ‘ चे मुकुंद शिंदे ,राष्ट्रवादी काँग्रेस चे बबलू जाधव ,व्यापारी महासंघाचे सचिन निवंगुणे,युवक क्रांती दल शहराध्यक्ष सचिन पांडुळे ,अप्पा अनारसे उपस्थित होते .