स्वारगेट भुयारी मार्गाच्या निकृष्ट कामाच्या चौकशीसाठी घंटानाद आंदोलन

Share this News:

7 /8/2019, स्वारगेट:

स्वारगेट भुयारी मार्गाच्या निकृष्ट कामाच्या चौकशीसाठी आज माहिती अधिकार कार्यकर्ते निलेश प्रकाश निकम यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन करण्यात आले.

आज दि ७ ऑगस्ट रोजी कार्यकारी अभियंता,महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळ, ( शिबिर कार्यालय, पुणे ) येथे हे आंदोलन झाले.

स्वारगेट जेधे चौक येथील वाहन भुयारी मार्गामार्गाचे निकृष्ट दर्जाचे काम झाल्याकारणाने पुराव्यासहित केलेल्या तक्रारी अर्जावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही म्हणून त्या निषेधार्थ घंटानाद आंदोलन करण्यात आले.

निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारा विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, हा पूर्णपणे खराब दर्जाचा रस्ता बनवला आहे ,त्याची आय.आय.टी मुंबई यांच्याकडून चाचणी करण्यात यावी, तसेच सल्लागाराला व ठेकेदाराला काम झाल्यानंतर दिलेल्या आगाऊ दिलेल्या बिलाबाबत जबाबदार व्यक्तीवर तत्काळ कारवाई करण्यात यावी, अशा मागण्या करण्यात आल्या.

तक्रारी अर्ज पुराव्यासहित देऊन सुद्धा त्यावर कारवाई करून काम का केले नाही ,याबाबत चौकशी समिती बसवून त्या चौकशी समिती मध्ये नागरिक, आंदोलकांचा सदस्य प्रतिनिधी नियुक्त करून त्याचा अहवाल प्राप्त करावा.या प्रकरणात ठेकेदाराकडून काही आर्थिक देवाण -घेवाण झाल्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे त्याची शहानिशा करण्यात यावी.
कारवाईचे लेखी स्वरूपात आश्वासन द्यावे, अशी मागणी करण्यात आली.

आंदोलनाला निलेश निकम,प्रकाश निकम,गणेश जोशी,विशाल अलकुंटे,सुजित हांडे,कुणाल हेंद्रे, विजय रेड्डी,तम्मा कुसळकर, दीपक तुसाम इत्यादी उपस्थित होते.

कारवाईबाबत मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर आंदोलनाची तीव्रता वाढवली जाईल व त्याची संपूर्ण जबाबदारी ही शासनाची राहील असा इशारा निलेश प्रकाश निकम यांनी दिला आहे.