कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पुढील काही दिवस सर्व शासकीय कार्यक्रम रद्द -जिल्हाधिकारी नवल किशोर राम

Share this News:

पुणे, दि. 12: जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पुढील काही दिवस सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. यादरम्यान जे खाजगी कार्यक्रम, सण, उत्सव तसेच इतर कार्यक्रम साजरे होणार असतील त्याबाबत खबरदारी घ्यावी अन्यथा स्वत:हून कार्यक्रम टाळावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी राम म्हणाले, पुणे शहर व जिल्हयात कोरोना संसर्गाचे आव्हान आपल्यासमोर आहे. त्या पार्श्वभूमीवर शासकीय पातळीवर पुणे जिल्हयात होणारे शासकीय कार्यक्रम पुढील काही दिवस रद्द करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हयात यापुर्वीच आयोजित करण्यात आलेले विविध कार्यक्रम आयोजकांनी रद्द करण्यासाठी स्वत:हून विचार केला पाहीजे, असेही जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले.