पुणे विभागात कोरोना बाधित 472 रुग्ण : विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
विभागातील 68 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
पुणे दि.15:- विभागातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 472 झाली आहे. तथापी ॲक्टीव रुग्ण 362 आहेत. विभागात कालच्या अहवालानंतर 15 एप्रिल 2020 रोजी 3 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे तीनही रुग्ण पुणे महानगरपालिका क्षेत्रातील आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
15 एप्रिल रोजी ससून हॉस्पीटल येथे पुण्यातील 73 वर्षीय कोरोना बाधीत रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या रुग्णास निमोनिआ व किडनी विकार होता. 15 एप्रिल 2020 रोजी ससून हॉस्पीटल येथे पुण्यातील 34 वर्षीय कोरोना बाधीत रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच ससून हॉस्पीटल येथे पुण्यातील 63 वर्षीय कोरोना बाधीत रुग्णाचा मृत्यू झाला असून या रुग्णास निमोनिआसह मायोकार्डीटीस विकार होता.
विभागात 472 बाधित रुग्ण असून 42 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात 427 बाधीत रुग्ण असून 39 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात 11 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात 2 बाधीत रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात 26 बाधीत रुग्ण असून कोल्हापूर जिल्हयात 6 बाधीत रुग्ण आहेत.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 6 हजार 236 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 5 हजार 943 चा अहवाल प्राप्त आहे. तर 293 नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 5 हजार 427 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 472 नमुन्यांचा अहवाल पॉजिटिव्ह आहे.
आजपर्यंत विभागामधील 33 लाख 93 हजार 921 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 1 कोटी 30 लाख 29 हजार 12 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 787 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.