१२० अंध विद्यार्थिनींना साहित्य वाटप आणि भोजन

Share this News:

18/12/2019, पुणे :

राष्ट्रवादी युवक काँग्रेस, पुणे शहरच्या वतीने ‘द पूना स्कुल ऑफ ब्लाइंड गर्ल्स’ (कोथरूड) च्या १२० अंध विद्यार्थिनींना उपयोगी साहित्याचे वाटप आणि भोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांच्या वाढदिवसानिमित्त या उपक्रमाचे आयोजन केले होते, अशी माहिती उपक्रमाचे आयोजक राष्ट्रवादी युवक काँग्रेस, पुणे शहरचे सरचिटणीस गिरीश गुरुनानी यांनी पत्रकाद्वारे दिली.

धीरज शर्मा (राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष) यांनी शाळेतील अंध विध्यार्थींसमवेत केक कापून वाढदिवस साजरा केला.

हा कार्यक्रम आज बुधवारी सकाळी गांधी भवन, कोथरूड येथे सकाळी ९ वाजता झाला.

यावेळी स्वप्नील दुधाणे, सनी मानकर, महेश हांडे, बापू डाकले, मृणाल ववले, प्रमोद शिंदे आणि सहकारी उपस्थित होते.

धीरज शर्मा यावेळी बोलताना म्हणाले, ‘माझा हा वाढदिवस विस्मरणीय आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून वेगळाच आनंद आणि समाधान मिळाले. जेवणाचा आनंद घेताना अंध विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून मन भारावून गेले.

‘समाजात जनजागृती निर्माण करणे आणि सामाजिक उपक्रमातून मदत करणे हा हेतू या उपक्रमाचा होता’ असे ‘राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे सरचिटणीस गिरीश गुरुनानी म्हणाले.