केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या निधनाबाबत खासदार गिरीश बापट यांची प्रतिक्रिया

Share this News:

24/8/19 : माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांचे आज निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. नरेंद्र मोदीजी यांच्या सरकार मध्ये अर्थमंत्री म्हणून त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले.

 

राजकारणासह साहित्यअर्थकारणवकीली अशा विविध क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता. मितभाषी आणि कार्यतत्पर अशी त्यांची ख्याती होती.

 

सुषमाजी यांच्या जाण्यानंतर जो मोठा धक्का आम्हाला व पक्षाला बसला होता त्यातून आम्ही सावरलो नव्हतो. तोच हा मोठा आघात सर्वाच्या मनावर झाला आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.