बहुचर्चित ‘गर्लफ्रेंड’ चा ट्रेलर आणि म्युझिक लाँचसोहळा संपन्न  

Share this News:


फर्स्ट लुक पासून उत्सुकता वाढवलेल्या

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर यांच्या प्रमुख भूमिका बहुचर्चित गर्लफ्रेंडयामराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा नुकताचमोठ्या उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी चित्रपटाचे लेखक – दिग्दर्शक उपेंद्र सिधये, निर्माते अनिश जोग, रणजीत गुगळेयांच्यासह सर्व कलाकार, तंत्रज्ञ उपस्थित होते.

चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये अमेय वाघ म्हणजेच नचिकेत प्रधानसिंगल असल्याने अत्यंत भावूक झालेला दिसतो. आपल्याला गर्लफ्रेंड का मिळत नाही? याचा विचार करण्याचा सल्ला नचिकेतला त्याचे मित्र-मैत्रिणी देतात, तर नचिकेतचा बॉस नचिकेतला गर्लफ्रेंड नसल्यामुळे त्याची चेष्टा करत उलट सुलट प्रश्नांची सरबत्ती करत असल्याचे दिसते. नचिकेतची आई त्याला थेट विचारते, तुला मुलं आवडतात का? अशा घटनांमुळे नचिकेतच्या मनात गर्लफ्रेंड नसल्याबद्दलची खंत अधिक वाढीस लागते. दरम्यान, नचिकेत बरोबर पावसाच्या सरींमध्ये भिजताना मोहक दिसणारी अलिशा म्हणजेच अभिनेत्री सई ताम्हणकर दिसते. त्यामुळे आजवर सिंगल असणाऱ्या नचिकेतला अचानक गर्लफ्रेंड कशी मिळाली? हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

ह्यूज प्रॉडक्शन्स आणि प्रतिसाद प्रॉडक्शन्स प्रस्तुत गर्लफ्रेंडचित्रपटाला हृषीकेश-सौरभ-जसराज यांचे संगीत असून यात विविध धाटणीची गाणी आहेत. गीतकार क्षितीज पटवर्धनयांच्या गीतांना श्याल्मली खोलगडे, श्रुती आठवले, जसराज जोशी यांचा आवाज लाभला आहे. नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ या गाण्याने सोशल मिडीयावर धमाल उडवली आहे, वेस्टर्न म्युझिकचा तडका असलेले लव्ह स्टोरीहे गाणे या गाण्यातून सई – अमेय यांच्यातील केमिस्ट्री दिसते. तर ‘कोडे सोपे थोडे, अवघड थोडे पडले का रे’ नचिकेत अलिशाच्यानात्याबद्दलची उत्कंठा निर्माण करते.

‘गर्लफ्रेंड’ चित्रपटात अमेय वाघ आणि सई ताम्हणकरयांच्यासह सागर देशमुख, रसिका सुनील, ईशा केसकर,कविता लाड, यतीन कार्येकर, तेजस बर्वे, सुयोग गोऱ्हे, उदयनेने यांच्या भूमिका आहेत. एखादा इंट्रोव्हर्ट मुलगा गर्लफ्रेंडच्या शोधात असेल तर काय गंमती-जमती घडतात याचामनोरंजक प्रवास असलेला ‘गर्लफ्रेंड’ हा चित्रपट येत्या २६ जुलै पासून सर्वत्र प्रदर्शित होत आहे