सुट्टीच्या कालावधीत शासकीय कार्यालये सुरू ठेवावीत- जिल्हाधिकारी राम
पुणे, दिनांक 9- जिल्ह्यात जुलै व ऑगस्टमध्ये झालेल्या पावसामुळे गंभीर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.
पुरपरिस्थितीत नागरीकांना आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देणे आवश्यक असल्यामुळे सर्व शासकीय विभागांची कार्यालये पूर परिस्थितीच्या निवारणासाठी दि. 10, 11 व 12 ऑगस्ट 2019 रोजी शासकीय सुट्टी असली तरी कार्यालये सुरू ठेवावीत, असे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत.