अनाथ, दिव्यांग, गतीमंद बालके आणि वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांचे लुल्लानगर मध्ये आतिथ्य

Share this News:

6/9/19, पुणे :

गणेशोत्सवाचे औचित्य साधून अनाथ, दिव्यांग, गतीमंद बालकांचे आणि वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांचे आदरातिथ्य लुल्लानगर मध्ये करण्यात आले. लुल्लानगरच्या माणिकचंद मलबार हिल सोसायटीमध्ये सामाजिक बांधिलकी जपत गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जातो . त्यासाठी ललित कावेडिया आणि सौ . मीना कावेडिया यांनी पुढाकार घेतला आहे .

४ , ५ सप्टेबर रोजी सूर्योदय सोशल फाऊंडेशनची २०० बालके आणि जनसेवा फाऊंडेशनच्या वृद्धाश्रमातील शंभर ज्येष्ठांना घरी बोलवून गणेश दर्शनाच्या निमित्ताने सन्मान , भोजन आणि आदरातिथ्य केले.दंत तपासणी .,कपडेवाटप असे उपक्रम आयोजित केले. यावेळी कावेडिया कुटुंबाचा सन्मान राजेशकुमार साकला यांच्या हस्ते करण्यात आला . लायन्स क्लब चे माजी प्रांतपाल गिरीश मालपाणी ,जनसेवा फौंडेशनचे डॉ विनोद शहा उपस्थित होते .

७ तारखेला सेवाधाम संस्थेच्या दिव्यांग बालकांना भोजन आणि आदरातिथ्यसाठी निमंत्रित करण्यात आले आहे . वानवडी ,कोंढवा भागातील बालकांनाही त्यांनी निमंत्रित केले आहे .२५ वर्षापासून हा उत्सव चालू आहे. या वर्षी कावेडिया कुटुंबीयांनी शिर्डी साई बाबा मंदिराची प्रतिकृती तयार केली आहे.ती कौतुकाचा विषय झाला आहे. गणेशसेवेत आणि सामाजिक उपक्रमात ललीत कावेडिया यांच्या समवेत मीना कावेडिया,रिया कावेडिया, रेयांश कावेडिया या सर्वांची मदत होते.

पुण्याच्या घरगुती गणेशोत्सवाला समाजसेवेचा नवा आयाम देत ललित कावेडिया, मीना कावेडिया कुटुंबियांच्या घरी गणेशसेवा सुरु आहे . गरीब ,दिव्यांग ,अनाथ आणि वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांची सेवा,आदरातिथ्य हे कावेडया यांच्या घरगुती गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य आहे . कावेडिया यांच्याकडे ११ दिवसांचा उत्सव असतो.