राज्यातील 107 शिक्षकांचा शिक्षक दिनी गौरव

Share this News:

मुंबई, दि. 5/9/2019 : राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या राज्य शिक्षक आणि सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते यांना एकत्र करून एक शिक्षक परिषद येणाऱ्या काळात निर्माण करणे आवश्यक असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी केली जाते. प्राथमिक, माध्यमिक आणि विशेष शिक्षक, आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षक तसेच सावित्रीबाई फुले आदर्श स्त्री शिक्षिकांना राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारे सन २०१८-१९ चे  आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा मुंबईतील रंगशारदा हॉटेल येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री ॲङ आशिष शेलार,आमदार सरदार तारासिंह, आमदार कपिल पाटील, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे सचिव सौरभ विजय,शिक्षण आयुक्त विशाल सोलंकी यांच्यासह शिक्षक, शिक्षिका, पुरस्कार विजेत्यांचे कुटुंबिय  उपस्थित होते. राज्य शिक्षक पुरस्कारार्थींना एक लाख रुपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. याच पुरस्कार सोहळ्या दरम्यान डॉ. संजय उपाध्ये यांनी उपस्थितांशी  संवाद साधून आपल्या कविता सादर केल्या.

 श्री. तावडे यावेळी म्हणाले, शिक्षक परिषदेच्या माध्यमातून त्यांना येणारे अनुभव, त्यांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी केलेले प्रयत्न इतर शिक्षकांना समाजातील आणि त्याचा फायदा राज्यातील विद्यार्थ्यांना होईल. एक शिक्षक फक्त विद्यार्थी घडवत नाही तर तो समाज आणि राष्ट्र घडवितो. आज आदर्श शिक्षक पुरस्कार ऑनलाईन केल्यामुळे अगदी आदिवासी, गावपाड्यात उत्तम काम करणाऱ्या शिक्षकांचाही सन्मान झाला असल्याचे सांगून शिक्षक दिनानिमित्त राज्यातील पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांचे अभिनंदन श्री. तावडे यांनी यावेळी केले.

विद्यार्थ्यांसाठी शिक्षक हे रोल मॉडेल  — ॲड. आशिष शेलार

श्री. शेलार यावेळी म्हणाले, येणाऱ्या काळातही विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर शिक्षकांनी भर द्यावा. शिक्षक दिनीच शिक्षकांचा सन्मान होणे ही बाब महत्वाची आहे. कारण विद्यार्थीच नाही तर देशाचे नागरिक घडविण्याचे काम शिक्षक करीत असतात आणि यासाठी हे शिक्षक काम करीत असतात. महाराष्ट्राला उज्ज्वल शिक्षण, उत्कृष्ट शिक्षक आणि शिक्षण सुधारकांची परंपरा आहे. विद्यार्थ्यांना घडविण्याची अत्यंत महत्वाची जबाबदारी शिक्षकांवर असते. येणाऱ्या काळातही शिक्षक विद्यार्थ्यांसाठी रोल मॉडेल ठरतील असा विश्वास ॲङ शेलार यांनी यावेळी व्यक्त केला.

सन २०१८-१९ च्या राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी शासनाने शालेय शिक्षण व क्रीडा विभाग स्तरावर १०७ शिक्षकांची निवड केलेली असून त्यामध्ये ३७ प्राथमिक शिक्षक, ३९ माध्यमिक शिक्षक, १८ आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे प्राथमिक शिक्षक, ८ सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका, २ विशेष शिक्षक (कला/क्रीडा ) व १ अपंग शिक्षक/अपंग विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक व १ गाईड शिक्षक व १ स्काऊट शिक्षक यांचा समावेश आहे.

पुरस्कार प्राप्त शिक्षकांची यादी खालीलप्रमाणे


प्राथमिक शिक्षक पुरस्कारार्थी
अ.क्र. शिक्षकाचे नाव पदनाम शाळेचे नाव व पत्ता जिल्हा
श्री. मिश्रा ब्रह्मदेवबिपति सहाय्यक शिक्षक हनुमान नगर म.न.पा.उ.प्रा.हिंदी शाला कांदिवली (पूर्व) मुंबई ४00१०१ मुंबई
श्री. तिवारी अरविंदकुमार राधाचरण सहाय्यक शिक्षक के.के. मार्ग मनपा हिंदी शाला क्र.-१ सातरस्ता, संत गाडगे महाराज चौक, जेकब सर्कल मुंबई-११ मुंबई
श्रीमती. कुसेकर चंदाराणी माधव सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद शाळा आडीवली, केंद्र-भाल, ता. अंबरनाथ, जि. ठाणे पिन. ४२१३०१ ठाणे
श्री. दातीर संतोष गोपा सहाय्यक शिक्षक रा.जि.प.शाळा, दहिगांव ता. कर्जत, जि. रायगड रायगड
श्री. तळेकर संतोष भगवान सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दह्याळे, केंद्र – कासा, ता.डहाणू, जि. पालघर पालघर
श्रीमती. शेख रेशमा महंमद रफिक सहाय्यक शिक्षक जि.प.प्राथमिक शाळा – लांडेवस्ती मु.पो. लांडेवस्ती, तळेगाव ढमढेरे, ता-शिरुर, जि-पुणे पूणे
श्री. कुदळे कृष्णा खंडू सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकणेवस्ती (नंदादेवी) पो.रावणगाव, ता.दौंड, जि.पुणे पुणे
श्रीमती. शिंदे श्रीकांता संजय सहाय्यक शिक्षक जि.प.प्रा.शाळा भापकरवस्ती, ता.शेवगाव,जि.अहमदनगर अहमदनगर
श्रीमती. पेटकर मनिषा हरिश्चंद्र सहाय्यक शिक्षक जि.प.प्रा. शाळा पोंधवडी ता. करमाळा, जि. सोलापूर सेालापूर
१० श्री. पाटील पांडुरंग राजाराम सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवे रातीर, मु.नवे रातीर पोष्ट कऱ्हेतालुका बागलाण, जिल्हा नाशिक पिनकोड – ४२३३०१ नाशिक
११ श्री. अहिरे जितेंद्र तानाजी सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद मराठी शाळा-धाडरी ता. जि. धुळे धुळे
१२ श्रीमती. पाटील उज्वला रंगनाथ सहाय्यक शिक्षक जि.प.शाळा रनाळेमुली नंदुरबार नंदुरबार
१३ श्री. चव्हाण लक्ष्मण धाकलू सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शिंदी मु. पो. शिंदी ता. चाळीसगाव जि. जळगाव जळगाव
१४ श्री. जगताप संजय शंकर सहाय्यक शिक्षक केंद्रीय प्राथमिक शाळा, माण, ता.शाहूवाडी, जि. कोल्हापूर, पिन – ४१५ १०१ कोल्हापूर
१५ श्री. जाधव बालाजी बाबुराव सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विजयनगर ता. माण जि. सातारा सातारा
१६ श्री. सावंत अनिलकुमार ज्ञानदेव सहाय्यक शिक्षक जि.प.शाळा कवलापूर ता. मिरज जि. सांगली सांगली
१७ श्री. पाटील मनोज नरसी सहाय्यक शिक्षक जि.प.पूर्व प्राथमिक शाळा वेलदूर नवानगर ता. गुहागर जि. रत्नागिरी पिनकोड ४१५७०३ रत्नागिरी
१८ श्री. गेासावी उदय रमाकांत सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा वालावल पूर्व ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग
१९ श्री. ठोंबरे शशिकांत बाळकृष्ण सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिंगणी केंद्र नवगाव तालुका पैठण, जिल्हा औरंगाबाद औरंगाबाद
२० श्री. ढाकरके सुनिल विश्वनाथ सहाय्यक शिक्षक जि.प.प्राथ.शाळा वंजार उमरद, केंद्र जामवाडी ता. जि. जालना जालना
२१ श्री. परदेशी विकास मच्छिंद्र सहाय्यक शिक्षक जि.प.प्राथ.शाळा उमरद खालसा, केंद्र – खांडे पारगाव, ता.जि.बीड -४३१ १२२ बीड
२२ श्री. मस्के सिध्दार्थ विठ्ठलराव सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, फुलकळस, ता. पूर्णा जि.परभणी परभणी
२३ श्री. गिरी पांडूरंग गणपतबुवा सहाय्यक शिक्षक जि.प. प्रा.शा.राहोली बु. ता.जि. हिंगोली हिंगोली
२४ श्री. पांचाळ सुशीलकुमार मुरलीधरराव सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कानेगांव ता.शिरुर अनंतपाळ जि.लातूर लातूर
२५ श्री. सिराज अनवर म.मिरान सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद हायस्कूल तामसा ता.हदगाव जि. नांदेड नांदेड
२६ श्री. चौधरी दिलीप विश्वनाथ सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंबडवाडी, पो.तडवळे ता.जि.उस्मानाबाद उस्मानाबाद
२७ श्री.चापले बळीराम दादाजी सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजूलवाडी पंचायत समिती उमरेड जिल्हा नागपूर नागपूर
२८ श्री. पारधी मनोहर बळीराम सहाय्यक शिक्षक जि.प.प्राथ शाळा पलाडी पो. आमगाव (दिघोरी) ता.भंडारा, जि.भंडारा भंडारा
२९ श्री. साकुरे पुरुषोत्तम गोपाल सहाय्यक शिक्षक जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळा मुंडीपार/ईश्वर केंद्र-कोसमतोंडी, पं.स.सडक/अर्जुनी, जि.प.गोंदिया गोंदिया
३० श्री. दागमवार अनिल मारोतराव सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक हिंदी शाळा, घुग्घुस पंचायत समिती चंद्रपूर जि.चंद्रपूर चंद्रपूर
३१ श्री. खांडेकर प्रमोद धर्मराव सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद‍ डिजीटल प्राथमिक शाळा अडपल्ली, केंद्र काटली, पं.स.गडचिरोली पिन ४४२६०५ गडचिरोली
३२ श्रीमती. मेहता सीमा श्रीराम सहाय्यक शिक्षक जि.प.केंद्रिय प्रा.शाळा,बोरगांव मेघे पं.स.वर्धा, जि.वर्धा वर्धा
३३ श्री. बाबरे विलास वासुदेवराव सहाय्यक शिक्षक जि.प.पूर्व माध्य.भानखेड (बु.) पो. भानखेड (खुर्द) पिनकोड ४४४९०४ता.जि.अमरावती अमरावती
३४ श्री. सेानोने दत्तात्रय रामचंद्र सहाय्यक शिक्षक जि.प.वरिष्ठ प्राथ शाळा दधम पं.स.बाळापूर जि अकोला अकोला
३५ श्री. मेारे राजू नामदेव सहाय्यक शिक्षक जि.प.वरिष्ठ प्रा. शाळा, गोहोगाव पो-महागाव ता. रिसोड जि.वाशीम वाशीम
३६ श्री. राठोड प्रेमचंद देवसिंग सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा, नारखेड ता. नांदुरा जि. बुलढाणा बुलढाणा
३७ श्री. चव्हाण आसाराम झासु सहाय्यक शिक्षक जि.प.उच्च प्राथमिक मराठी शाळा, तरोडा पो. बेलोरा ता. आर्णी जि. यवतमाळ यवतमाळ

माध्यमिक शिक्षक पुरस्कारार्थी
अ.क्र. शिक्षकाचे नाव पदनाम शाळेचे नाव व पत्ता जिल्हा
श्रीमती. नेटवटे ज्योती मधुकर सहाय्यक शिक्षक एस.आई.ई.एस.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम मेमोरीयल हायस्कूल घाटकोपर (प)मुंबई मुंबई (उ)
श्रीमती. अन्सारी फौजिया गुलाम मोहम्मद मुख्याध्यापक अंजुमन ई-इस्लाम बेगम शरीफा कालसेकर गर्ल्स इंग्लिश हायस्कूल, साबू बाग, २६०, जे.बी.बी.मार्ग, मुंबई-४००००८ मुंबई (द)
श्री. मोहिते संजय रघुनाथ सहाय्यक शिक्षक डी.एस.हायस्कूल, ९९/१०१ स्किम नं.६ रोड क्र. २४ शीव मुंबई २२ मुंबई (द)
डॉ. श्रीमती. ढेरे उमा महेश सहाय्यक शिक्षक हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल मुन्शी नगर डी.एन.रोड, अंधेरी (प)मुंबई ४०००५८ मुंबई (प)
श्री. पाटील गुलाबराव पंडीतराव मुख्याध्यापक सम्राट अशेाक हायस्कूल कल्याण पूर्व ता.कल्याण, जि. ठाणे ४२१३०६ ठाणे
श्री. वाघमारे रविंद्र बाबू सहाय्यक शिक्षक श्री स.म.वडके विद्यालय, चोंढी किहीम ता. अलिबाग, जि. रायगड रायगड
श्री. खुताडे चंद्रकांत लक्ष्मण सहाय्यक शिक्षक के.एल.पोदा हायस्कूल, डहाणू, पारनाका ता.डहाणू, जि. पालघर ४०१६०१ पालघर
श्रीमती. कानिटकर मेधा महेश सहाय्यक शिक्षक माईर एम.आय.टी. चे श्री. संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय, १२७,१/अ, पौड रोड, कोथरूड, पुणे-४११०३८ पुणे
श्री. वीर प्रदीप हरिभाऊ मुख्याध्यापक माध्यमिक विद्यालय, कांबरे,खे.बा. पोस्ट करंदी खे.बा. (नसरापूर) ता. भोर, जि. पुणे पुणे
१० श्री. खंडागळे प्रशांत बबनराव सहाय्यक शिक्षक लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालय, मिशन कंपाऊंड कापड बाजार, अहमदनगर अहमदनगर
११ श्री. शहा आशितोष मोहनलाल मुख्याध्यापक श्री दिगंबर जैन गुरुकुल हायस्कुल व क. महाविद्यालय, सोलापूर १३ ब क डी इ.बुधवार पेठ, बाळीवेल, सोलापूर सोलापूर
१२ श्री. व्याळीज दिपक सखाराम मुख्याध्यापक आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सामुंडी, ता.त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक नाशिक
१३ श्री. सोनवणे जयवंत बाबुराव सहाय्यक शिक्षक राजीव गांधी माध्यमिक विद्यालय, अनमोल नगर, देवपूर, धुळे ४२४००२ धुळे
१४ श्री. वाडेकर दिनेश सुकलाल सहाय्यक शिक्षक श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूल, नंदुरबार, मुख्य पोस्ट ऑफिस जवळ धुळे रोड नंदुरबार ४२५४१७ नंदुरबार
१५ श्री. निकम‍ रविंद्र दयाराम मुख्याध्यापक कै. यादव दगडू पाटील माध्यमिक विद्यालय तांदुळवाडी, ता. भडगाव, जि. जळगाव जळगाव
१६ श्री. कुंभार मच्छिंद्र रघुनाथ सहाय्यक शिक्षक आदर्श हायस्कूल, भामटे, ता.करवीर, जि.कोल्हापूर कोल्हापूर
१७ श्रीमती. देशपांडे सुवर्णा विश्वास सहाय्यक शिक्षक डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे ची, न्यू इंग्लिश स्कूल, सातारा सातारा
१८ श्री. सोनुरे मधुकर बाबू सहाय्यक शिक्षक श्री.वि.ऊ.बा.पटवर्धन कन्या प्रशाला तासगाव ता. तासगाव, जि. सांगली सांगली
१९ श्री. पाटील शिवाजी आबा सहाय्यक शिक्षक न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज खेर्डी चिंचघरी (सती) ता.चिपळूण, जि. रत्नागिरी पिनकोड – ४१५६०५ रत्नागिरी
२० श्री. शिंदे संदिप बळवंत सहाय्यक शिक्षक अर्जुन रावराणे विद्यालय, वैभववाडी मु.पो.ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग
२१ श्री. निकम सुनिल अभिमन सहाय्यक शिक्षक संस्कार प्रबोधिानी प्रशाला शिवशंकर कॉलनी तानाजी चौक, औरंगाबाद औरंगाबाद
२२ श्री. जंजाळ कौतिकराव भिकाजी सहाय्यक शिक्षक रंगनाथराव पाटील माध्यमिक व उच्च‍ माध्यमिक विद्यालय जामवाडी, ता.जि.जालना जालना
२३ श्री. धस रामनाथ हरिभाऊ सहाय्यक शिक्षक मोतीलाल कोठारी विद्यालय कडा, ता. आष्टी, जि. बीड बीड
२४ श्री. वडसकर त्र्यंबक पंडीतराव सहाय्यक शिक्षक नृसिंह माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पोखर्णी, (नृ) ता.जि. परभणी परभणी
२५ श्री. गंगावणे रमेश नामदेवराव सहाय्यक शिक्षक सौ. सति मनकर्णीकाबाई पारनेरकर विद्या मंदिर हिंगणी, जि.हिंगोली हिंगोली
२६ श्री. मुखम दत्तात्रय शंकरराव मुख्याध्यापक अनु.जाती नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळा जाऊ, ता. निलंगा, जि. लातूर लातूर
२७ श्री. चव्हाण गोविंद चंदर सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद हायस्कूल मुलीचे मुखेड ता.मुखेड, जि. नांदेड नांदेड
२८ श्री. चव्हाण लक्ष्मण गुराप्पा सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद प्रशाला धानोरी ता. लोहारा, जि. उस्मानाबाद ४१३६०४ उस्मानाबाद
२९ श्रीमती. मुजुमदार चित्रा बिभूतीरंजन सहाय्यक शिक्षक श्री मोहनलाल रूधवानी सिंधी हिन्दी बॉईज हायस्कूल  व ज्यू. कॉलेज, पंचपावळी,जि.नागपूर नागपूर
३० श्रीमती. गालफाडे स्मिता विनोद सहाय्यक शिक्षक जि.प.हायस्कूल व कनिष्ठ‍ महाविद्यालय आसगाव, ता.पवनी, जि. भंडारा भंडारा
३१ श्री. बावनकर राजेंद्र आत्माराम सहाय्यक शिक्षक जिल्हा परीषद हायस्कूल नवेगाव बांध, पं.स. अर्जुनी, मोर जि.गोंदिया गोंदिया
३२ श्री. कन्नाके नरेंद्र गुरुदास सहाय्यक शिक्षक नेहरू विद्यालय शेगाव, बुज. तह.वरोरा, जि. चंद्रपूर चंद्रपूर
३३ श्री. चौथाले विठ्ठल लक्ष्मण सहाय्यक शिक्षक इंदिरा गांधी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय , येनापूर ता.चार्मोशी, जि. गडचिरोली गडचिरोली
३४ श्री. चव्हाण बळीराम रामदास मुख्याध्यापक भारत विद्यालय हिंगणघाट जि.वर्धा वर्धा
३५ श्री. प्रांजळे अनिल नारायणराव मुख्याध्यापक दीपशिखा गुरुकुल सैनिक शाळा, चिखलदरा, जि.अमरावती ४४४ ८०७ अमरावती
३६ श्री. शेगोकार नितीन सुरेश सहाय्यक शिक्षक श्री. सरस्वती विद्यालय आकोट, ता. आकोट, जि. अकोला ४४४ १०१ अकेाला
३७ श्री. चोपडे पंढरीनाथ राजाराम सहाय्यक शिक्षक श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, भर जहाँगीर, ता.रिसोड, जि.वाशिम वाशिम
३८ श्री. चेके अनंता सुखदेव मुख्याध्यापक शहाजी राजे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, उंद्री, ता. चिखली जि. बुलढाणा बुलढाणा
३९ श्री. बनारसे किशेार भास्करराव सहाय्यक शिक्षक मारोतराव पाटील विद्यालय कवठा (बा) ता. आर्णी, जि. यवतमाळ यवतमाळ
आदिवासी प्राथमिक शिक्षक पुरस्कारार्थी
अ.क्र. शिक्षकाचे नाव पदनाम शाळेचे नाव व पत्ता जिल्हा
डॉ. ढमके गंगाराम गणपत सहाय्यक शिक्षक जि.प.शाळा चेरवली,केंद्र कीन्हवली, ता. शहापूर जि.ठाणे ठाणे
श्री. काजळे रवी किसन सहाय्यक शिक्षक रायगड जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक शाळा, झुगरे वाडी, ता.कर्जत, जि.रायगड रायगड
श्री. पावबाके विजय बाळासाहेब सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद शाळा गोवणे, मु.पो. गोवणे, केंद्र चंद्रनगर, ता.डहाणू, जि. पालघर पालघर
श्री. येवले नंदकुमार फुलचंद सहाय्यक शिक्षक जि.प.प्राथमिक शाळा डिंभे बु, केंद्र गुहे बु. ता.आंबेगाव जि.पुणे पुणे
श्री वायळ लालू महादु सहाय्यक शिक्षक जि.प.प्राथ.शाळा गोडेवाडी, ता. अकोले, जि. अहमदनगर अहमदनगर
श्री. परदेशी प्रमोद पांडुरंग सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद‍ प्राथमिक शाळा, धामडवी, पो. भावलीखुर्द, ता.इगतपुरी, जि. नाशिक नाशिक
श्रीमती. तारगे अनुराधा रघुनाथ सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद शाळा करंजळी पाडा, ता. दिंडोरी . जि.‍ नाशिक नाशिक
श्री. काशिद दिलीप शिवाजी सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद शाळा कोकण गाव, ता. साक्री, जि धुळे धुळे
श्रीमती.गुगळे स्नेहल सर्जेराव सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कलमाडी, त.बो, ता. शहादा, जि.नंदुरबार नंदुरबार
१० श्री. करनकाळ आनंदराव संपतराव सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद शाळा बामडोद, ता. जि. नंदुरबार नंदुरबार
११ फकीर मुबारकशाह सिकंदरशाह सहाय्यक शिक्षक जिल्हा परीषद मराठी मुलांची शाळा, मोरव्हाल, ता. रावेर, जि. जळगाव जळगाव
१२ श्री मुनेश्वर रमेश यादवराव सहाय्यक शिक्षक जिल्हापरिषद प्राथमिक शाळा, लोणी ता. किनवट, जि. नांदेड नांदेड
१३ श्री. भास्कर पांडुरंगजी जांभुळकर सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कांद्री, केंद्र मनसर, पंचायत समिती रामटेक जिल्हा परिषद नागपूर नागपूर
१४ श्री. सुर्यवंशी मनोहर तुलशिदास सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा खांबी, केंद्र निमगाव, पंचायत समिती अर्जुनि / मोर, जि गोंदिया गोंदिया
१५ श्री. मडावी बंडू प्रभुदास सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद उच्च्‍ा प्राथमिक शाळा, भुरकुंडा, (बु.), केंद्र अहेरी, पंचायत समिती राजूरा, जि. चंद्रपूर चंद्रपुर
१६ श्री चौधरी पुरंदर रामचंद्र सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पालापुंडी, केंद्र मालेवाडा, ता.कुरखेडा, जि गडचिरोली गडचिरोली
१७ श्री आचेवार प्रभाकर पोचन्ना सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुनघाडा (माल), पंचायत समिती चामोर्शी,  जिल्हा परिषद गडचिरोली गडचिरोली
१८ श्री. आडे किरण विष्णु सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मलकापूर, केंद्र बदनापुर, पंचायत समिती चिखलदरा, जि.अमरावती अमरावती
         
दिव्यांग शिक्षक पुरस्कारार्थी
अ.क्र. शिक्षकाचे नाव पदनाम शाळेचे नाव व पत्ता जिल्हा
श्री. तुपे प्रशांत सुधाकर सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा नांदगाव,मु.पो.नांदगाव, ता. निफाड, जि. नाशिक नाशिक
2 विशेष शिक्षक पुरस्कारार्थी

अ.क्र. शिक्षकाचे नाव पदनाम शाळेचे नाव व पत्ता जिल्हा
श्रीमती. हुळबत्ते वंदना अशोक कला शिक्षक राणी सरस्वतीदेवी कन्या शाळा सांगली, तानाजी चौक, पेठभाग सांगली सांगली
श्री. मयेकर विनोद शशिकांत क्रीडा शिक्षक रा.भा. शिर्के प्रशाला, रत्नागिरी ता.जि. रत्नागिरी रत्नागिरी
स्काऊट व गाईड पुरस्कारार्थी
अ.क्र. शिक्षकाचे नाव पदनाम शाळेचे नाव व पत्ता जिल्हा
श्री. कोळेकर पोपट रामचंद्र सहाय्यक शिक्षक (स्काऊट ) जिल्हा परिषद शाळा नरसिंहपूर, नं-१ ता.वाळवा, जि. सांगली सांगली
श्रीमती माने उषा नागोराव सहाय्यक शिक्षक(गाईड) श्री. सरस्वती भुवन प्रशाला, रांजणी, ता. घनसावंगी, जि. जालना जालना
         
सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कारार्थी
अ.क्र. शिक्षकाचे नाव पदनाम शाळेचे नाव व पत्ता विभाग
श्रीमती. कोटियन प्रेमा मथाईस मुख्याध्यापक पुरुषोत्तम हायस्कूल, जनता एज्यूकेशन सोसायटी बिल्डिंग, के.बी.कोटियन मार्ग, खेरनगर, बांद्रे (पू) मुंबई ४०० ०५१ मुंबई विभाग
श्रीमती. मस्के सोजर ईश्वर मुख्याध्यापक जि.प.प्राथमिक केंद्रशाळा, खुनेश्वर ता.मोहोळ, जि.सोलापूर पुणे विभाग
डॉ. श्रीमती. जंगम मेघा बाळलिंग सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निफाड क्र.१ (उच्च प्राथमिक सेमी)मु.पो. निफाड, ता. निफाड, जि. नाशिक नाशिक विभाग
श्रीमती. धनावडे मुक्ताबाई हणमंत सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वागदरे, पो. म्हाते बु. ता.  जावली, जि. सातारा कोल्हापूर विभाग
श्रीमती. रगडे कविता बबनराव सहाय्यक शिक्षक एम.आय.टी.हायस्कूल, एन-४,सिडको, औरंगाबाद औरंगाबाद विभाग
श्रीमती. फारुखी आखेला नदीम नियामतुल्लाह सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद हायस्कूल, अर्धापूर, ता. अर्धापूर, जि. नांदेड लातूर विभाग
श्रीमती. फुलझेले दिक्षा महादेव सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंभारटोली, ता. आमगाव, जि. गोंदिया नागपूर विभाग
श्रीमती. देशमुख राधिका गौतमकुमार सहाय्यक शिक्षक शिवाजी बहुउद्देशीय मा.व उच्च मा. कनिष्ठ महाविद्यालय शिवाजीनगर, अमरावती अमरावती विभाग