“इंडिया जकात.कॉम”(indiazakat.com) चे प्रक्षेपण, जकात देणारे आणि जकात गोला करणारे, यांना जोडणाया साठी एक अनन्य व्यासपीठाची शुरुवात”

Share this News:

मुंबई, एप्रिल २४, २०२०: असोसिएशन ऑफ मुस्लिम प्रॉफेशनल्स (A M P) ने इंडिया जकात .कॉम (indiazakat.com) एक अनोखा ऑनलाइन जकात संग्रह आणि वितरण मंच सुरू केले, जे जकात देणार्‍यांना संपूर्ण भारतात जकात जामा करणार्‍यांशी जोडण्याचे काम करील.

इंडिया जकात.कॉम हे एक पारदर्शक व्यासपीठ आहे, जो संपूर्ण भारताततिल जकातदेणार्‍यांना आपल्या सामाजातील खाल्चया स्तराच्या सर्वांगीण उन्नती साठी सामूहिक पद्धतीने जकात गोळा करणार्‍या व उपयोगात आणार्‍या इतर स्वयं सेवी संस्था, शैक्षणिक संस्था, इत्यादी शी जोडेल. सुमारे दहा लक्ष गरीब व गरजू लोकान पर्यन्त पोहोचणे आणि त्यांना शिक्षण, कौशल्य, विकास, रोजगार, आणि उद्योजक्ता या
माद्यामातून मदत करणे हा व्यासपीठा मागील हेतु आहे, जेणे करून ते त्यांचा स्वतचा पायावर उभे राहून समाजात सकारात्मक योगदान देण्यास सूरूवात करतील.आणि अशा प्रकारे एक चांगला भारत घडविण्यात योगदान होईल.एएमपी(AMP)च्या द्रुष्टिकोणा प्रमाणे “आजचा जकात घेणारा माणूस उद्या जकात देणारा बनला पाहिजे” व त्यासाठी हे एक महत्वपूर्ण पाऊल होईल.

जकात इस्लाम धर्माच्या आधार स्तंभा पैकी एक आहे.एका वर्षाकाठी विशीष्ठ स्तरा पेक्षा श्रीमंत असलेल्या प्रत्येक मुस्लिम व्यक्तीला आपल्या कडील संपत्तीचा २.५ टक्के भाग गरीब नातेवाईक,शेजारी,गरजू व इतर कमकुवत घटकांना दान देणे अनिवार्य आहे.गेल्या वर्षी म्हणजे २०१९ मध्ये ए.एम.पी.द्वारा भारतातील सुमारे २०० शहरां मधील ४६०० जणा वरती आधारीत केलेल्या एका सर्वेक्षणा नुसार असे आढळले आहे की ७५ % पेक्षा जास्त लोक आपली जकातीची रक्कम एकतर आपल्या गरीब नातेवाईकांना किंवा स्थानिक संस्थांना देतात. देणगीवर कोणतेही विशेष लक्ष त्याचा उपयोगी सबंधी दिले जात नाही. विशेष म्हणजे बहुतेक प्रतिसाद दात्यांचा असा विश्वास आहे की ह्या पद्धती ऐवजी सामूहिक देणगी व्यवस्था असावी.आणी सामूहिक रीत्या जकात वितरणा मुळेच जीवनात परिवर्तन घडण्याची क्षमता आहे.
आजच्या परिस्थितीत जेंव्हा रमजान ह्या इस्लामी पवित्र महिन्याचे आगमन होत आहे.

ज्या महिन्यात मुस्लिम बांधव जकातीचा पैसा काढून त्याचे वितरण करतात.अशा वेळी कोविड-१९ च्या महामारीचे संकट पूर्ण देशात पसरले आहे. ह्या अनुषंगाने इंडिया जकात डॉट कॉम,या ऑनलाइन व्यासपीठाची सुरुवात अत्यंत महत्वाची व तषेच मोठया सवलतीची बाब आहे.कारण असेकी या सर्वे मार्फत एकीकडे जकात देणार्‍यां व जमा करणार्‍या लोकांमद्धे घर बसल्या परस्पर संपर्क शक्य होईल, व तसेच जकात्यीच्या वितरण करणार्‍या संस्थे किंवा कर्मचारी पर्यन्त साक्षात भेटी रहीत पोहोचवणे शक्य होईल.तर दुसरी कडे कोविड-१९ रोगाचा प्रसार थांबविण्या साठी सामाजिक अंतर ठेवण्याच्या सरकारी आदेशाचे पालन सुद्धा होईल. इंडिया जकातची प्रेरणा जगातल्या विविध देशात चालू असलेल्या जकातीचे केंद्रीकरण वसुली व्यवस्था आणि आधुनिक गर्दी निधी(Crowd funding) व्यासपीठा पासून मिळाली आहे.

ए एम पी हि संस्था मुस्लिम व्यावसायिक व स्व्यैच्छिक कार्यकर्त्याचा एक मंच आहे. ज्याच्या माध्यमातून ज्ञान,अनुभव,विवेक आणि तंत्र कौशल्याचे आदान- प्रदान करून मुस्लिम समाजाचा विशेष करून आणि समजाच्या इतर कमकुवत व मागास वर्गीयांचा सामान्यतः विकास आणि शैक्षणिक, आर्थिक व तसेच सामाजिक सबळीकरण यासाठी प्रयत्न चालू आहे. समजातल्या गरजू मुस्लिम व इतर लोकांच्या शैक्षणिक व आर्थिक क्षमतेच्या माध्यमातून विकासा साठी अशी एएमपी संस्था Societies Registration Act 1860 च्या अंतर्गत Registration No-2011 GBBSD 3001 द्वारे पंजीकृत आहे.

ए एम पी मुंबई टीम,
116/B RB चांदोरकर मार्ग,
अग्रिपडा,पोलिस स्टेशन जवळ,
मुंबई सेंट्रल.
फोन—-8291101312
Email — [email protected]