पहिल्या टप्प्याच्या वेगातच मेट्रोचे निगडीपर्यंतचे काम पुर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आमदार लांडगेंना आश्वासन

Share this News:

मेट्रो पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत नेण्यासाठी आमदार लांडगे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

पिंपरी, 15 फेब्रुवारी – पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत धावण्याची खबरदारी घेण्यात आली आहे. मेट्रोचे पिंपरीपर्यंत वेगात काम सुरु आहे. त्याच वेगात निगडीपर्यंतच्या मेट्रोचे काम पुर्ण केले जाईल, असे आश्वसान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. याबाबतची माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज आळंदी दौ-यावर होते. त्यावेळी मेट्रोची पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत किती आवश्यकता आहे. पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत पोहोचणे महत्वाचे आहे, याची सविस्तर माहिती भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिली. तसेच पीसीसीएफ या संघटनेच्या पदाधिका-यांची देखील मुख्यमंत्र्यांशी भेट घडवून दिली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्याबाबत आमदार महेश लांडगे आणि पीसीसीएफ या संघटनेच्या पदाधिका-यांशी सविस्तर चर्चा केली. मेट्रोचे काम टप्प्यात वगैरे करा, असे काही नाही. निगडीपर्यंत मेट्रो धावली जाणार आहे. आता पिंपरीपर्यंतच्या मेट्रोचे काम जेवढ्या वेगात आहे. तेवढ्याच वेगात निगडीपर्यंतच्या मेट्रोचे काम पुर्ण केले जाईल. त्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

आमदार महेश लांडगे म्हणाले, निगडीपर्यंत मेट्रो पहिल्याच टप्प्यात नेण्याबाबत मुख्यमंत्रीसाहेब सकारात्मक आहेत. त्यांनी त्याबाबत ठोस आश्वासन दिले आहे. पिंपरीपर्यंतच्या वेगानेच निगडीपर्यंतच्या मेट्रोचे काम पुर्ण केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता मेट्रो निगडीपर्यंत धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Follow Punekar News: