अजमेरा कॉलनीत ओपन जीम, आमदार महेश लांडगे यांच्या निधीतून जीमचे साहित्य

Share this News:

पिंपरी, 30 ऑगस्ट – पिंपरी, अजमेरा कॉलनीतील स्वप्ननगरी गृहनिर्माण सोसायटीत नागरिकांच्या मागणीनुसार ओपन जीम सुरु करण्यात आली आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या आमदार निधीतून जीमचे साहित्य देण्यात आले आहे.

 

पिंपरी महापालिकेच्या क्रीडा, कला, साहित्य, सांस्कृतिक समितीचे सभापती तुषार हिंगे, कार्तिक लांडगे यांच्या हस्ते सोसायटीच्या पदाधिका-यांकडे शुक्रवारी (दि. 30) जीमचे साहित्य सुपूर्द करण्यात आले. यावेळी सोसायटीचे चेअरमन तानाजी बाबर, सचिव अनिरुद्ध प्रधान, वर्षा पांगारे, कुमार अय्यर, दत्तात्रय जवळकर, नारायणचंद्र दत्त, भाऊसाहेब पांगारे, संगाप्पा मुळे, सतीश हेगडे, प्रसाद कामत, किशोर गुडेकर, कालुराम ढोबळे, हेमंत देशमुख, गोरख भापकर, किशोर मार्गमवार, अमित परदेशी, शेखर लांडगे, विशाल गाडेकर, सचिन पालेकर, हेमंत शिर्के, विक्रांत सरोदे उपस्थित होते.

 

सभापती तुषार हिंगे म्हणाले, “बदलत्या जीवनशैलीत सर्वांनी फिट रहाणे गरजेचे आहे. आमदार महेश लांडगे यांच्या आमदार निधीतून व त्यांच्या संकल्पनेतून ही ओपन जिम साकारण्यात आली आहे. नागरिकांनी नियमित व्यायाम करा, निरोगी आणि फिट रहावे” असे आवाहनही त्यांनी केले.

 

अजमेरा कॉलनीतील सर्वांत मोठी स्वप्ननगरी गृहनिर्माण सोसायटी आहे. या सोसायटीतील नागरिकांची अनेक दिवसांपासून ओपन जीम सुरु करण्याची मागणी होती. त्यांच्या मागणीनुसार आमदार महेश लांडगे यांच्या निधीतून ओपन जीम सुरु करण्यात आली आहे. त्याचे साहित्य आज देण्यात आले.