कँन्टोन्मेंट भागात गणपती विसर्जन हौद बांधण्याची मागणी

pune cantonment board
Share this News:

पुणे कँम्प, 20/8/2020: आगामी गणेशोत्सवात पुणे कँन्टोन्मेंट भागातील नागरिकांना घरगुती गणपती विसर्जन करण्यासाठी कँन्टोन्मेंट भागात तात्पुरते स्वरूपाचे विसर्जन हौद बांधण्यात यावेत अशी मागणी कर्तव्य फाउंडेशन व हिंद तरुण मंडळातर्फे पुणे कँन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी कर्तव्य फाउंडेशनचे अध्यक्ष विकास भांबुरे, नगरसेवक दिलीप गिरमकर, हिंद तरूण मंडळाचे अध्यक्ष सनी कु-हाडे आदी उपस्थित होते.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी धोबीघाट, डेक्कन टाँवर, राणी लक्ष्मीबाई उद्यान व जे.जे.गार्डन याठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाचे हौद बांधण्यात यावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली असून मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार यांनी हौद बांधण्याचे आश्वासन दिले.