पीआयसीटी महविद्यालायाच्या राष्ट्रीय  प्रकल्प स्पर्धेच्या  सहभागासाठी  देशभरातील विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद:पुण्यात भरणार तंत्रज्ञान मेळावा 

Share this News:
पुणे: नाविन्यपूर्ण कंप्यूटर (संगणक) आणि माहिती माहितीतंत्रज्ञान अभियांत्रीकीच्या देशपातळीवरील प्रकल्पांसाठी पीआयसीटी महविद्यालायात Impetus & Concepts 2019 या स्पर्धेचे आयोजन 22,23 आणि 24 मार्च 2019 रोजी करण्यात आलेले आहे .
या प्रकल्प स्पर्धेच्या प्रसिद्धीसाठी महाविद्यालयाचे विद्यार्थी देशभरात ठिकठिकाणी गेलेले होते त्यावेळी त्यांना नाशिक ,बंगलोर ,औरंगाबाद , गुलबर्गा ,चेन्नई आणि इतर ठिकाणांहून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे .या स्पर्धेत विद्यार्थ्यांना विविध प्रकल्प बघायला मिळतील त्यात बिग दाट , क्लाउड कॉम्पुटिंग , आणि बायोमेट्रिक आणि इतर प्रकल्प बघणे कुतुहलाचे ठरणार आहे .सदर स्पर्धेसाठी संगणक क्षेत्रातील अनेक नामांकित उद्योगसमूह प्रायोजक आहेत.
काम बघून माहितीतंत्रज्ञान कंपनीत रोजगाराची सुवर्ण संधी आहे आणि रोख पारितोषिके आदी बक्षिसे विजेत्यांना मिळणार आहे  स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य . पी टी .कुलकर्णी , कार्यक्रमाचे समन्वयक डॉ . गिरिश पोतदार ,प्रा. डॉ. इम्यानुअल मार्कस, प्रा योगेश हांडगे ,प्रा मनीष खोडस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी परिश्रम घेत आहेत