राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे पुण्यात स्वागत

Share this News:

पुणे,दि.१२: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे आज वायुसेनेच्या विमानाने लोहगाव विमानतळावर आगमन झाले. त्यांच्यासोबत पत्नी सविता कोविंद होत्या. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रपती महोदय यांचे स्वागत केले.

यावेळी परिवहन तथा सांसदीय कार्य मंत्री ॲड. अनिल परब, महापौर मुरलीधर मोहोळ, मेजर जनरल नवनीत कुमार, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनीही राष्ट्रपती महोदय यांचे स्वागत केले.

पुण्यातील एनआयबीएम संस्थेचा ‘५० वर्षपूर्ती निमित्त कार्यक्रम’ तसेच लोणावळा येथील इंडियन नेव्हल स्टेशन शिवाजी यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे पुण्यात आगमन झाले आहे.