Prof Dr Harish Tiwari gets ‘Innovative Leader National Award 2018’

Share this News:

प्रा. डॉ. हरिष तिवारी यांचा ‘इनोव्हेटिव लिडर नॅशनल ॲवार्ड 2018’ ने सन्मान

पिंपरी (दि. 12 जून 2018) पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयाचे (पीसीसीओईआर) प्राचार्य डॉ. हरिष तिवारी यांना ‘इनोव्हेटिव लिडर नॅशनल ॲवार्ड 2018’ ने सन्मान करण्यात आला.
डॉ. तिवारी यांची दोन वर्षापुर्वी पीसीसीओईआरचे प्राचार्य म्हणून नेमणूक झाल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात अनेक प्रशिक्षण व संशोधन पुरक उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये मागील दोन वर्षात शंभराहून जास्त पेटंटची नोंदणी करण्यात आली. तसेच महाविद्यालयात एकाच दिवशी दिडशेहून जास्त ‘कॉपी राईट’ ची नोंदणी करुन राष्ट्रीय विक्रम करण्यात आला. भारतीय अवकाश संशोधन केंद्र (इस्त्रो) च्या वतीने महाविद्यालयात मानवी जीवन अधिक सुखी व्हावे यासाठी अनेक संगणक प्रणाली उपग्रहामार्फत विकसित करण्याचे प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात येत आहे.
यामधील अनेक संगणक प्रणालीचा वापर मुंबई, नवी मुंबई मध्ये पाणीपुरवठा, वाहतुक समस्या आणि मेट्रोशहरात, स्मार्ट सिटी प्रकल्पांत करण्यात येत आहे. याचीच नोंद घेऊन दिल्लीमधील ‘लाईफ स्टार ग्लोबल वेलफेअर फाऊंडेशनच्या ’वतीने ‘इनोव्हेटिक लिडर नॅशनल ॲवार्ड 2018’ पुरस्कार देऊन केंद्रिय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे सल्लागार समिती सदस्य लतिफ मगदूम यांच्या हस्ते गौरविण्यात आले. हा पुरस्कार मिळाल्याबदल पीसीईटीचे अध्यक्ष व माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव व्ही.एस. काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई, पीसीसीओईचे प्राचार्य डॉ. ए.एम.फुलंबरकर, नुतन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र कानफाडे यांनी अभिनंदन केले.
———————-