पुणे जिल्‍ह्यातील पानटप-या बंद- जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम

Share this News:

पुणे, दि.19- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून सर्व पानटप-या बंद ठेवण्‍याचे आदेश जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी दिले आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूला (कोवीड-19) जगभरात पसरलेला साथीचा आजार म्‍हणून घोषित केलेला आहे. आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावरुन पुणे शहरामध्‍ये आणि परिसरामध्‍ये परदेशातून आलेले देशी, विदेशी नागरिक, पर्यटक यामुळे या विषाणूचा प्रादुर्भाव पसरण्‍याची परिस्थिती निर्माण झाली असल्याने जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी हा आदेश दिला आहे.