वाट चुकलेल्या आजोबांना पोलिसांचा आधार
अहो,साहेब माझा मुलगा धनकवडी मध्ये राहतो मला काय त्याचे घर सापडत नाही जरा सोडता का?ही आर्त हाक आहे एका वयोवृद्ध नागरिकाची.
दिनांक १७मे २०१९रोजी दुपारी भर उन्हात ३ ते ३:३०वाजण्याच्या सुमारास एक ६५ वर्षाचे वयोवृद्ध गृहस्थ राहणार चासकमान तालुका खेड जिल्हा पुणे हे म्हात्रे पुलाच्या खालून नदी पत्रातून चालत चालत झोपडपट्टी मध्ये आले त्यांच्या पायात चप्पल नव्हती पाय भाजत होते अशा अवस्थेत त्यांना तहान लागली होती व पोटात अन्नाचा कण नसल्यामुळे बोलण्याची ताकद सुद्धा नव्हती अशा परिस्थिती मध्ये ते दत्तवाडी दर्गा पर्यंत चालत आले व त्या ठिकाणी सध्या रमजान महिन्याचा मुस्लिम बांधवांचा उपवास चालू असल्याने पोलीस कर्मचारी बंदोबस्त साठी तैनात होते.त्या मध्ये महिला पोलीस कॉन्स्टेबल कृतिका शेंडे या उपस्थित होत्या त्यांना हे वयोवृद्ध आजोबा भेटले व म्हणाले की,मी चासकमान वरून आलो आहे.माझा मुलगा धनकवडी मधून राहतो त्याचे इस्त्रीचे दुकान आहे पण मला त्याच्या पर्यंत कसे जायचे हे समजत नाही मी वाट चुकलो आहे.मला तेवढ मुला पर्यंत सोडवा.असे सांगितल्यावर त्यांना प्रथम पाणी देऊन काही वेळाने चहा बिस्कीट खाण्यास दिल्यावर ते थोडे तरतरीत झाले.
काही वेळाने दत्तवाडी पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस उपनिरीक्षक सतीश भालेकर, बिट मार्शल पोलीस कॉन्स्टेबल अमोल झनझने पोलीस कॉन्स्टेबल चेतन गद्रे यांच्या सह त्यांना धनकवडी येथे विविध भागात फिरून त्यांचा मुलगा सोमनाथ शिंदे यांचा ३७/१फाईव स्टार सोसायटी धनकवडी हा पत्ता शोधून त्यांचा नातू विशाल सोमनाथ शिंदे यांच्या ताब्यात दिले.ह्या प्रसंगी विशाल शिंदे यांनी पोलिसांनी आपल्या आजोबांना सुखरूप आणून सोडले बद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.