मधुमेह मुक्त विश्वासाठी पुणेकरांचा पावसातही उदंड प्रतिसाद

Share this News:

16/9/19 : दिवंगत डा. क्षीकांत जिचकर यांच्या कडून प्रेरणा घेऊन मधुमेह आणि स्थुलत्व मुक्त विश्वाची संकल्पना सार्थक करण्यासाठी गेली सहा वर्षे अविरत परीश्रम करणार्या डा. जगन्नाथ दीक्षित यांच्या अभियानाला आज पुणेकरांनी अभुतपूर्व प्रतिसाद देत पावसाची तमा न बाळगता पाच किलोमीटर चालून भरघोस पाठींबा दिला.

डॉ. दीक्षित या अभियानाचे मूळ प्रेरणास्ञोत म्हणून स्व. डॉ. श्रीकांत जिचकार यांना आदरस्थानी मानतात. त्यांच्याप्रति कृतज्ञता वक्त करण्यासाठी, डा जिचकरांच्या जयंती चे औचित्य साधून आज जगभरातील भारता सह अमेरीका, कोरीया, मलेशिया, सिंगापूर ,आस्ट्रेलिया आणि 20 आखाती देश मिळून एकुण 194 शहरांमध्ये या वॉकेथॉन चे आयोजन करण्यात आले होते. जगभर एकाच वेळी सुमारे 50 हजार लोकांनी ५ किलोमीटर चे अंतर पार करुन या अभियानास आपली हजेरी लावली.

 

पुण्याचे विभागीय आयुक्त  दिपक म्हैसकर यांनी सकाळी सणस मैदान येथुन झेंडा दाखवून या वाकेथान ची सुरवात केली. कार्यक्रमाला माजी विभागीय आयुक्तप्रभाकर देशमुख सुध्दा विशेष पाहुणे म्हणून आले होते. आशिया खंडातील 7 खाड्या पोहुन जाणारे रोहन मोरे यांच्या सहित या अभियानामध्ये सक्रीय सहभागी असणारे पुण्यामधील प्रसिध्द मधुमेह तज्ञ डा संजय गांधी आणि डा रविंद्र किवळकर देखील उपस्थित होते.

टिळक रोड-लकडी पूल- गुडलक चौक- गरवारे चौक परत लकडी पूल- टिळक रोड मार्गे सणस मैदान येथे या वॉकेथॉन ची सांगता झाली. वॉकेथॉन मध्ये सहभागी होणाऱ्या सर्वांना टोप्या तसेच प्रमाणपत्र देण्यात आले.

पुणेकर नागरीक नेहमीच समाजयोगी कार्यामध्ये अग्रेसर असतात. लाखो पुणेकर या डाएट प्लान ला जोडले गेले आहेत. त्याचीच प्रचिती आज सणस मैदान येथे पहायला मिळाली. लहान मुलांसह , 79 वर्षांचे आजोबा आणि 75 वर्ष्यांच्या त्यांच्या पत्नी यांनी उत्साहात हे पाच किमी चे अंतर पार केले. पावसाची तमा न बाळगता सुमारे 2000 लोकांनी 5 किमी चे अंतर लिलया पूर्ण केले.

कार्याक्रमाचे सुत्र संचालन प्रशांत कुलकर्णी व अर्चना मावळ यांनी केले. अडोर ट्रस्ट चे विश्वस्त शिवाज कदम यांच्या मार्गदर्शना नुसार सुमारे 80 स्वयंसेवकांच्या चमू ने आज ही वाकेथान सफल करण्यात महत्वपूर्ण भूमिका पार पाडली.