Ramzan Mubarak – 15 varieties of dates in Camp market 

Share this News:

रमजानच्या उपवासानिमित्त बाजारपेठेत ९५ प्रकारचे खजूर दाखल 

रमजानच्या उपवासानिमित्त बाजारपेठेत ९५ प्रकारचे खजूर दाखल झाले आहेत , पुणे कॅम्प भागातील छत्रपती शिवाजी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात यंदाच्या वर्षी देखील खजूर मुस्लिम बांधवाना आपला उपवास सोडण्यासाठी खरेदी करण्यासाठी गर्दी केली आहे . हे सर्व खजूर इराण , उमान व इराण या पर देशामधून आपल्या बाजारपेठेत भारतीय बाजारपेठेत विक्रीस येतात . अशी माहिती प्रसिध्द खजुराचे व्यापारी फरीद शेख अब्बास यांनी दिली . 

 मुंबईमधील वाशी मार्केट मधून पुण्यात आम्ही खजूर विक्रीस आणतो , यंदाच्या वर्षी खजुर कमी आल्यामुळे खजूर महाग झाले आहेत . तसेच , नोटाबंदीमुळे देखील खजूराची खरेदी ग्राहक थोड्या प्रमाणात करत आहेत . नोटबंदीमुळे आणि खजुराचे वाढलेल्या भावामुळे खजूर ग्राहक कमी प्रमाणात करत आहे . बाजारात कमीतकमी ३०० रुपये पासून तर जास्तीत जास्त  २२०० रुपये खजूर विक्रीस उपलब्ध आहेत . 

यामध्ये अजवा , अंबर , मगजोल , किमया , यास्मिन , फरद , कलमी , इराणी , सुशीला , गुलाबी , ग्रीन फरद आदी खजूर बाजारात विक्रीस उपलब्ध आहेत . त्यामध्ये इराणचे खजूर स्वस्त आहेत तर उमानचे खजूर महाग आहेत . खजूर खरेदी करण्यासाठी   पुणे कॅम्प भागातील छत्रपती शिवाजी मार्केटमध्ये ग्राहकांनी गर्दी केली आहेत .